चला हवा येऊ द्या - उद्धव ठाकरे

वांद्रे - ‘चला हवा येऊ द्या’ असे म्हणत राजकारणातील प्रदुषण कमी करण्यासाठी मी आहेच असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. हवेतील प्रदुषण कमी करण्यासाठी वायू मशिन्स आणि शिव ग्रामीण टॅक्सी योजनेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी झाला त्यावेळी ते बोलत होते. कलानगर शिवाय मुंबईत चार ठिकाणी वायू मशिन्स लावण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार होते, मात्र हजर राहू शकले नाहीत. तसेच हा कार्यक्रम राज्य सरकारचा असला तरी भाजपाचा एकही मंत्री आणि स्थानिक खासदार पूनम महाजनही कार्यक्रमात हजर नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या.

Loading Comments