किन्नर प्रिया पाटील पालिका आखाड्यात

    मुंबई  -  

    दादर - किन्नर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रिया पाटील मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या आखाड्यात आपलं नशीब आजमावत आहेत. वॉर्ड क्र.166 मधून त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. किन्नर समाजाच्या अनेक समस्या आहेत ज्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे त्यांनी मुंबई लाइव्हशी बातचित करताना सांगितले. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न हा महत्त्वाचा असल्याचे सांगत आपण महिला आणि तरुणींसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरणं किंवा जिंकण हे महत्त्वाचं नसून, लोकांसाठी आणि विशेषत: आपल्या समाजासाठी काम करायचंय अशी प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.