Advertisement

पोलीसांच्या पत्नींचे पुन्हा धरणं आंदोलन


पोलीसांच्या पत्नींचे पुन्हा धरणं आंदोलन
SHARES

मुंबई - पोलिसांना आठ तास ड्युटी, हक्काचे घर, मुलांना पोलीस दलात नोकरी या तसेच इतर अनेक मागण्यांसाठी पोलीसांच्या पत्नींनी शनिवारी आझाद मैदानात ठिय्या दिला. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन देऊन नऊ महिने उलटले तरी समितीचा अद्याप पत्ता नसल्यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पोलीसांच्या पत्नींनी हे आंदोलन केलं. पोलिसांचे हक्क, त्यांच्यावर होणारा अन्याय याला वाचा फोडण्यासाठी राज्यातील पोलीसांच्या पत्नीं एकत्र आल्या. मार्च महिन्यात आझाद मैदानात उपोषण करून पोलीसांच्या पत्नींनी सरकारचे आपल्या मगण्यांकडे लक्ष वेधले होते. यावेळी या सर्व मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. या आश्‍वासनाला नऊ महिने उलटले तरी अद्याप समिती स्थापन झालेली नाही. यामुळे संतप्त पोलीस पत्नी शनिवारी पुन्हा आंदोलनाला बसल्या. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा