अबू आझमी पुन्हा बरळले

 Pali Hill
अबू आझमी पुन्हा बरळले

मुंबई - थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये बंगळूरूत काही महिलांचा विनयभंग झाल्याने देशात खळबळ उडाली आहे. याबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असताना आता समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमींनी यात उडी घेतली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अबु आझमी म्हणाले की, 'महिलांनी परिधान केलेले शॉर्ट कपडे या घटनेला कारणीभूत आहे, महिलांच्या मते ती जितकी जास्त नग्न दिसते, तितकीच ती फॅशनेबल आहे' पेट्रोलमुळे आग भडकते, तसेच साखर पडली तर तिथे मुंग्या येतातच, त्यामुळे भारतीय संस्कृतीचा स्वीकार करा' असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा वादाल तोंड फोडलंय.

Loading Comments