कांदिवलीत 'यादवी'

 Kandivali
कांदिवलीत 'यादवी'

कांदिवली - मुंबई महापालिका निवडणुकीत कांदिवलीतील प्रभाग क्रमांक 31 मध्ये यादवी चांगलीच गाजणार आहे. या प्रभागात काँग्रेसच्या विद्यमान उमेदवार डॉ. गीता यादव, काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांना भाजपाने उमेदवारी दिलीय. तर शिवसेनेनेही अॅडव्होकेट कमलेश यादव यांना उमेदवारी दिल्यामुळे हे सर्व यादव आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे या प्रभागात यादवी पाहायला मिळणार आहे.

मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक कमलेश यादव यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे याच कमलेश यादव यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. भाजपाने त्यांना प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली असून काँग्रेसच्या वतीने डॉ. गीता यादव यांना आणि शिवसेनेने अॅडव्होकेट कमलेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पक्षानेही कैलास यादव यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार असून त्यातील चार उमेदवार हे यादव कुटुंबातील आहेत.

Loading Comments