यशवंत जाधव यांना लाभले भाग्य गटनेते बनण्याचे !

  Mumbai
  यशवंत जाधव यांना लाभले भाग्य गटनेते बनण्याचे !
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईच्या महापौरपदी वर्णी लागावी म्हणून आपली सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक यांची अखेर पक्षाने महापालिकेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. शिवसेनेने महापालिका गटनेतेपदी यशवंत जाधव यांची नेमणूक केल्याचे कोकण विभागीय आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जाधव कुटुंबाला महापौरपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ कुणाच्या गळयात पडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  महापौरपदाच्या स्पर्धेत यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर यांची नावे होती. तर महिलांमधून विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, शुभदा गुडेकर आणि राजुल पटेल यांची नावे प्राधान्याने घेतली जात आहेत. परंतु यापैकी यशवंत जाधव यांचे नाव महापालिकेच्या शिवसेना गटनेतेपदी पक्षाने जाहीर करून टाकले. पक्षाच्या मुखपत्रातून ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेची सत्ता आल्यास यशवंत जाधव हे सभागृहनेते ठरले जाणार आहे. मात्र, सभागृहनेतेपदाच्या स्पर्धेत माजी आमदार विशाखा राऊत आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांची नावे आघाडीवर होती. परंतु गटनेतेपदी यशवंत जाधव यांचे नाव जाहीर करून या दोघांचेही पत्ते साफ केले आहे. मात्र, या दोन्ही नगरसेविकांना कुठलीही अपेक्षा नसल्याने भविष्यात या दोघी आपल्या अनुलेखाने भाजपाला त्यांची लायकी दाखवतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे. यशवंत जाधव हे आक्रमक असले तरी पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांच्यातील आक्रमकता कमी झाली आहे. पण महापौरपद नाही किमान सभागृहनेता पद मिळाले हेच जाधव यांच्यासाठी मोठे असल्यामुळे सभागृहात आपण आपले कर्तृत्व आणि कौशल्य सिद्ध करू, असा निर्धार त्यांनी केला आहे. यशवंत जाधव यांनी यापूर्वी महापालिकेत बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्षपद तसेच स्थायी समिती सदस्यपद भूषवले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.