मनविसेच्या सदस्यपदी पंकज वैद्य

 Pali Hill
मनविसेच्या सदस्यपदी पंकज वैद्य

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी पंकज प्रमोद वैद्य यांची नेमणूक करण्यात आली. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने, आदित्य राजन शिरोडकर आणि मनसे प्रदेश सचिव सचिनदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यपदी पंकज प्रमोद वैद्य यांची नेमणूक करण्यात आली. पंकज प्रमोद वैद्य हे गिरगावातील धडाडीचे कार्यकर्ते असल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Loading Comments