Advertisement

शिवसेनेच्या 'या' मंत्र्याने तरुणाला गाडीखाली चिरडलं

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव गाडीने भाजी विकणाऱ्या एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता. सावंत यांच्या चालकाने तेथून पळ काढला.

शिवसेनेच्या 'या' मंत्र्याने तरुणाला गाडीखाली चिरडलं
SHARES

शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीनं सोलापूरच्या बार्शी येथे एका तरुणाला उडवलं. हा अपघात इतका भीषण होता की, त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने तानाजी सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघात घडला त्यावेळी सावंत हे गाडीत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे सकाळी १० च्या सुमारास तानाजी सावंत यांची फाॅर्च्युनर ही गाडी भरधाव वेगात निघाली होती. त्यावेळी एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव गाडीने भाजी विकणाऱ्या एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला.  स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता सावंत यांच्या चालकाने तेथून  पळ काढला. त्यामुळे संतापलेल्या जमावाने सावंत यांची गाडी तोडफोड करत, पोलिस प्रशासनाकडे सावंत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.हेही वाचा -

नवरात्रौत्‍सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज

पैशाच्या जोरावर मुन्ना झिंगाडाचा ताबा मिळवणार पाकिस्तान?
संबंधित विषय
Advertisement