नवरात्रौत्‍सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज

नवरात्रौत्सव निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या गरबांच्या आयोजकांना पोलिसांनी पूरूष व महिला सुरक्षा रक्षक, सीसटिव्ही कॅमरे, आयोजनाच्या ठिकाणी सर्वत्र विद्युत रोषणाई, अग्निप्रतिबंध वस्तू या सारख्या अनेक सूचना दिल्या आहेत.

नवरात्रौत्‍सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज
SHARES

मुंबईत सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असताना मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेली महालक्ष्मी आणि मुंबादेवी ही मंदिरं उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. त्यामुळं या ठिकाणी कोणता ही अनुच्चित प्रकार घडू नये, या निमित्तानं पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. मंदीर परिसरात ५०हून अधिक सीसीटिव्ही, सर्व मुख्य दरवाजांवर मेटल डिटेक्टर आणि हॅड डिटेक्टरद्वारे सुरक्षा रक्षक तैनात केली आहे. तसंच, मुंबईतील प्रसिद्ध आणि भाविक मोठ्या संख्येनं भेट देणाऱ्या नवरात्रौत्सव मंडळांनाही पोलिसांनी आयोजनाबाबत सूचना केल्या आहेत.

खबरदारीचं आवाहन

गणपतीचा बंदोबस्त संपत नाही, तोच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात त्यात भर म्हणजे दसरा, नवरात्रौत्सवाची. ऐन सणाच्या निमित्तानं होऊ घातलेल्या निवडणुका आणि दहशतवाद्यांच्या कायम केंद्र स्थानी असलेल्या मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना डोळ्यात तेल घालून पाहारा द्यावा लागणार आहे. सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना परिसरात मोठ्या आणि लहान नवरात्रौत्सवानिमित्त खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सुरक्षेबाबत विशेष काळजी

नवरात्रौत्सव निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या गरबांच्या आयोजकांना पोलिसांनी पूरूष व महिला सुरक्षा रक्षक, सीसटिव्ही कॅमरे, आयोजनाच्या ठिकाणी सर्वत्र विद्युत रोषणाई, अग्निप्रतिबंध वस्तू या सारख्या अनेक सूचना दिल्या आहेत. त्याच बरोबर गरब्याच्या ठिकाणी येणाऱ्या महिला आणि तरुणींच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

ड्रग्जची मागणी

आयोजित केलेल्या गरब्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना शक्यतो पास किंवा ओळखिच्या व्यक्तींनाच सहभागी करून घेण्याचं आवाहन केलं आहेत. नवरात्रौत्सवाच्या कालावधीत ड्रग्जची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळं दांडिया, नवरात्र आयोजन या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसंच, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या हालचालींवरही पोलिसांची बारीक नजर असणार आहे.

ओळखपत्र तासण्याचे आदेश 

मुंबईतील महत्वाची मंदिर आवारात बॉम्‍बशोधक पथक, दंगलकाबू पथक, शीघ्र कृती दलासह अशी पथकं नेमण्‍यात आली आहेत. त्याच बरोबर परिसरातील हॉटेल किंवा यात्री निवास इथं अनोळखी व्यक्तींना वास्तव्यास देताना ओळखपत्र तासण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. त्याशिवाय, नवरात्रौत्सवात सोनसाखळी चोर महिलांना लक्ष करत असतात. त्यामुळं शहरातील सर्व प्रमुख आणि महत्वाच्या चौकात रात्रीच्या वेळेस पोलिसांकडून नाकाबंदी राहणार आहे.



हेही वाचा -

Vidhan Sabha Election 2019: काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा