SHARE

भायखळा - एएमआयएमने मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी आपल्या 18 उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. या यादीमध्ये क्रिकेटपटू युसूफ पठाणचा मेहुणा उमर साद याच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. उमर साद हा भायखळ्यातील वॉर्ड क्रमांक 208 इथून निवडणूक लढणार आहे. अनेक वर्षांपासून उमर साद हा सामाजिक कामे करत असल्याने त्याला आम्ही उमेदवारी दिल्याची माहिती एएमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या