Advertisement

मिशन पालिका निवडणूक


मिशन पालिका निवडणूक
SHARES

कामाठीपुरा - पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आणि पालिकेत सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महानगरपालिका 2017 निवडणुकीसाठीची युवासेना आणि भारतीय विद्यार्थी सेना मुंबादेवी विधानसभा यांची संयुक्त बैठक कामाठीपुराच्या शाखा क्रमांक 213 येथे बुधवारी झाली. या बैठकीत शिवसेनेची ताकद काय आहे, युवासेना काय करू शकते हे येत्या पलिका निवडणुकीत दाखवून द्यायचं आहे. तसंच घरा-घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्या, त्यांचाशी संपर्क ठेवा असं भारतीय विद्यार्थी सेनेचे कोर कमिटी बाळा अहिरेकर यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. या बैठकीत भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग संघटक जितेंद्र भाटकर, युवा विभाग अधिकारी अल्केश म्हेत्री, युवासेना आणि भारतीय विद्यार्थी सेना मुंबादेवी विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement