युवासेनेच्या घेरावानंतर प्राचार्यांची दिलगिरी

 Pali Hill
युवासेनेच्या घेरावानंतर प्राचार्यांची दिलगिरी
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - शासकीय तंत्र निकेतनामध्ये युवासेनेचे बोर्ड लावल्यामुळे ७ विद्यार्थ्यांच्या घरी महाविद्यालय प्राचार्यांनी नोटिसा पाठवल्या आहेत आणि खार पूर्व निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या विरोधात युवा सेनेने जोरदार आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारून धारेवर धरलं होतं. युवासेनेने प्राचार्यांना घेरावही घातला. या प्रकरणी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी तसेच विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, याची लेखी हमी द्यावी अशी मागणी युवा सेनेने केलेली. या सर्व प्रकारावर प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त करताना सात विद्यार्थ्यांच्या पालकांना माफीपत्र दिलंय तसंच आठ तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगीही या विद्यार्थ्यांना दिली आहे.

Loading Comments