Advertisement

‘मुंबई लाइव्ह’च्या दणक्यानं जागं झालं म्हाडा प्रशासन


‘मुंबई लाइव्ह’च्या दणक्यानं जागं झालं म्हाडा प्रशासन
SHARES

मुंबई - गोरेगाव, मोतीलालनगरमधील लेआऊटमध्ये फेराफर करत येथील 14 घरे बिल्डरांच्या घशात घातल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश नुकताच ‘मुंबई लाईव्ह’नं केला होता. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच म्हाडा प्रशासन खडबडून जागं झालंय. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी त्वरित सध्याचा लेआऊट रद्द करत 14 घरे मोतीलाल नगरच्या लेआऊटमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिलेत. म्हाडा अधिकारी, आर्किटेक्ट आणि विकासकानं संगनमतानं मोतीलालनगरच्या लेआऊटमध्ये फेरफार करत येथील 14 घरे पत्राचाळीच्या लेआऊटमध्ये समाविष्ट करत ही जागा बळकावली होती. तर ही घरे रिकामी करावीत म्हणून पत्राचाळीचा पुनर्विकास करणारा विकासक रहिवाशांवर दबाव टाकत आहे. लेआऊटमध्ये फेरफार करणे हा गुन्हा असतानाही हे धाडस म्हाडा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने केला आहे. पण मुंबई लाइव्हच्या वृत्ताची दखल घेत आता लवकरच लेआऊट सुधारण्यात येणार असल्याची माहिती लाखे यांनी ‘मुंबई लाईव्ह’सह मोतीलालनगर विकास समितीला दिलीय. त्यामुळे आता या 14 रहिवाशांना दिलासा मिळाला असून, या रहिवाशांनी ‘मुंबई लाइव्ह’चे आभार मानलेत.
लेआऊटचा प्रश्न तर लाखे यांच्या आश्वासनामुळे मार्गी लागला, पण लेआऊटमध्ये फेरफार करणाऱ्या दोषी अधिकारी-आर्किटेक्ट आणि विकासकावर कारवाई होणार का असा प्रश्न ‘मुंबई लाइव्ह’नं उपस्थित केला होता. त्यानुसार लाखे यांनी या प्रकरणाची निश्चित चौकशी होईल आणि याप्रकरणी कारवाईही होईल, असे आश्वासन दिलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा