बिल्डरला एसआरएचा दणका

 Pali Hill
बिल्डरला एसआरएचा दणका

मुंबई - झोपु योजनेच्या नावाखाली मोठा एफएसआय लाटणारा बिल्डर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) जाळ्यात अ़़डकला आहे. कुमार मुर्दानी नावाच्या बिल्डरच्या मुसक्या एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी आवळल्या आहेत. 224 गाळे(घर), 2 बालवाड्या, 2 वेल्फेअर सेंटर आणि 2 सोसायटी ऑफिस असे एकूण 230 गाळे एसआरएला न देता एफएसआयने लाटल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. बिल्डर दोषी आढळल्याने प्रकल्पाचे बांधकाम त्वरीत बंद करत विक्री थांबवावी. तसेच बिल्डरविरोधात एमआरटीपी कायद्यांर्तगत कडक कारवाई करण्याचे आदेश पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

खार-वांद्रे येथे पाच आणि जोगेश्वरी येथे एक अशा सहा झोपु योजना या बिल्डरकडून राबवल्या जात आहेत. 2013 मध्ये खार-वांद्रेमधील पाच योजनांच्या मोबदल्यातील गाळे जोगेश्वरीत बांधून देण्याची परवानी बिल्डरला देण्यात आली. त्यासाठी बिल्डरला खार-वांद्रेसारख्या परिसरात अडीच एफएसआयही मिळाले. एफएसआय लाटत बिल्डरने खारमध्ये लक्झ्युरीयस टॉवर बांधले पण जोगेश्वरीत अतिरिक्त गाळे काही अजूनपर्यंत बांधलेच नाहीत. ही बाब एका तक्रारीद्वारे एसआरएसमोर आली आणि त्यातूनच एफएसआय घोटाळा पुढे आला. एमआरटीपी कायद्यानुसार बांधकाम पाडले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Loading Comments