घराचं स्वप्न होणार पूर्ण?

 Ghatkopar
घराचं स्वप्न होणार पूर्ण?
घराचं स्वप्न होणार पूर्ण?
घराचं स्वप्न होणार पूर्ण?
घराचं स्वप्न होणार पूर्ण?
घराचं स्वप्न होणार पूर्ण?
See all

घाटकोपर - मुंबईत गरीब आणि मध्यमवर्गीय बहुसंख्य आहेत. महाराष्ट्र सरकारतर्फे 10 लाख घरं बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. घाटकोपर, तानसा पाइप लाइन येथील एका समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या वेळी 400 घरांच्या किल्ल्याही प्रदान करण्यात आल्या. या वेळी त्यांच्या हस्ते नगरसेवकांच्या कार्य अहवालाचं प्रकाशनही झालं.

बुधवारी सायंकाळी राजावाडी रोड नं. 7 आणि गारोडियानगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रभाग 127च्या नगसेविका रितू तावडे आणि प्रभाग 133च्या नगरसेविका फाल्गुनी दवे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. 2012 ते 2016 या कालावधीत या दोन्ही नगरसेविकांनी केलेल्या कामांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. या सोहळ्यास खासदार किरीट सौमय्या, महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आमदार राम कदम आणि भाजपाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Loading Comments