Advertisement

परवडणाऱ्या घरांच्या योजना बिल्डरांना परवडेना


परवडणाऱ्या घरांच्या योजना बिल्डरांना परवडेना
SHARES

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्वांना घरे अशी हाक देत परवडणाऱ्या घरांचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कामाला लागली आहे हे खरे, पण परवडणाऱ्या घरांच्या योजना बिल्डरांना काही परवडताना दिसत नाहीत.

पंतप्रधान आवास योजनेंर्तगत घरे बांधण्यासाठी एकही बिल्डर पुढे येत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने मुंबई महानगर प्रदेशात या योजनेंर्तगत घरे बांधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवल्या आहेत. पण, या निविदेला बिल्डरांकडून ठेंगा दाखवला जात असल्याने ही योजनाच अडचणीत आली असून सर्वसामान्यांच्या परडणाऱ्या घरांचे स्वप्न लांबत चालले आहे.

कल्याण, ठाणे आणि पनवेल अशा ठिकाणी पीएमएवाय योजनेंर्तगत अंदाजे 3500 घरे बांधण्यासाठी कोकण मंडळाने फेब्रुवारीमध्ये निविदा काढल्या. पण, या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याने एकदा नव्हे तर तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एक वा दोन निविदा सादर झाल्यास नियमाप्रमाणे मुदतवाढ द्यावीच लागते असे म्हणत झेंडे यांनी या निविदेला निश्चित प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, सरकारी योजना मग ती धारावी असो वा बीडीडी चाळ वा पीएमएवाय खासगी बिल्डर या योजनांकडे पाठच फिरवताना दिसतात. मुळात सध्या मार्केटमध्ये मंदीचे वातावरण असल्याने बिल्डर पुढे येत नसल्याचे म्हाडातील सुत्रांकडून सांगितले जात आहे. पण म्हाडाच्या योजनांमध्ये अनेक अडचणी जशा कि रहिवाशांचा विरोध आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे बिल्डरांना सरकारी योजना परवडत नसल्याचे काही विकासकांचे म्हणणे आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement