Advertisement

सेन्सेक्स पोहोचला 'पस्तिशी'त, ३१२ अंकांची वाढ


सेन्सेक्स पोहोचला 'पस्तिशी'त, ३१२ अंकांची वाढ
SHARES

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने बुधवारी नवा उच्चांक सर करत पहिल्यांदाच पस्तीशी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १०,८०० च्या जवळ पोहोचला. विशेष म्हणजे केवळ १७ ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्सने १००० हजार अंकांची वाढ नोंदवली आहे.

बुधवारच्या व्यावसायिक सत्रात सेन्सेक्सने तिहेरी शतक (३१२.८९ अंक) झळकावत ३५,०८३ चा आकडा गाठला. त्याचसोबत निफ्टीनेही ८८ अंकांनी वधारून १०,७८७ वर मजल मारली. आयटी आणि बँकिंग शेअर्सच्या चौफेर खरेदीने शेअर बाजाराने उसळी मारली.

बँकिंग शेअर्समध्ये कर्नाटक बँक, सिंडिकेट बँक, बँक आॅफ बडोदा, अॅक्सिस बँक, एसबीआय इ. बँकांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली. तर आयटी शेअर्समध्ये इन्फोसिस, टीसीएस, माईंड ट्री इ. कंपन्यांचे शेअर्स वधारले.


सेन्सेक्सने यापूर्वी कधी गाठला उच्चांक ?

तारीख
सेन्सेक्स
निफ्टी
१५ जानेवारी
३४,९६३.६९
१०,७८२.६५
१२ जानेवारी३४,६३८.४२१०,६९०.२५
९ जानेवारी३४,५६५.६३१०,६६४.६०
८ जानेवारी३४४८७.५२१०,६३१.२०
५ जानेवारी३४,१७५१०,५६६.१०


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा