Advertisement

Share market crisis: घसरणीतही गुंतवणुकीची संधी

सेन्सेक्स (sensex) शुक्रवारी तब्बल ३४०० तर निफ्टी (nifty) ९०० अंकाने कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टीतील या एेतिहासिक घसरणीमुळे शुक्रवारी शेअर बाजारात ४५ मिनिटांसाठी लोअर सर्किट लागले. शेअर बाजाराच्या इतिहासात एकाच दिवशी एवढी मोठी घसरण कधीच झाली नाही.

Share market crisis: घसरणीतही गुंतवणुकीची संधी
SHARES

भारतीय शेअर बाजारासाठी (Indian stock market) शुक्रवारचा दिवस हा काळ दिवस म्हणूनच नोंदला जाईल. भारतात कोरोना विषाणूचा (coronavirus) पहिला बळी गेल्याने गुंतवणूकदारांची धास्ती वाढली आहे. कोरोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम पाहता गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवला. त्यामुळे सेन्सेक्स (sensex) शुक्रवारी तब्बल ३४०० तर निफ्टी (nifty) ९०० अंकाने कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टीतील या एेतिहासिक घसरणीमुळे शुक्रवारी शेअर बाजारात ४५ मिनिटांसाठी लोअर सर्किट लावावे लागले.  भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एकाच  दिवशी एवढी मोठी घसरण कधीच झाली नव्हती.  या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ११ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याआधी गुरूवारीही शेअर बाजारांनी एेतिहासीक पडझड पाहिली.  गुरूवारीही सेन्सेक्सने तब्बल ३१०० अंकांची आपटी खाल्ली. 

कोरोनाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. त्यामुळे या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने  महासाथ म्हणून घोषित केले आहे. याचेच गंभीर पडसाद गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर बाजारात उमटले. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना लाखो रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे.  ४५ मिनिटांसाठी शेअर बाजाराचे व्यवहार थांबून बाजार पुन्हा सुरू झाले.  त्यानंतर बाजारात मात्र रिकव्हरी दिसून आली. 

 खरंतर एवढ्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. बाजार तात्पुरता सावरला असला तरी आणखी मोठी घसरण होऊ शकते याची धास्ती गुंतवणूकदारांना आहे.  मात्र, आता गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता या मोठ्या पडझडीकडे एक संधी म्हणून पहायला हवं.  अनेक चांगले शेअर्स आता मोठ्या प्रमाणावर खाली आले आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक केली ती नक्कीच फायद्याची ठरेल. कोरोना इफेक्ट उतरल्यावर काही दिवसात बाजार पुन्हा सावरतीलच. 

मागील अडीच महिन्यात जवळपास २२ टक्क्यांनी शेअर बाजार घसरला आहे. अशा परिस्थितीत पुढे काय होईल हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. मात्र, पुढील ४ ते ६ महिन्यात बाजारात २० टक्के वाढ पहायला मिळू शकते. याआधी १८ ते २४ महिन्यात बाजार पुन्हा पूर्वपदावर आल्याचं दिसून आलं आहे. म्हणजे १०० टक्के सुधारणा झाल्याचं दिसलं आहे. आतापर्यंत झालेल्या घसरणीचा ट्रेंड बघितला तर सध्या तरी कोणतंच असं कारण नाही की बाजारात रिकव्हरी होणार नाही. शेअर बाजाराच्या घसरणीचा आणि रिकव्हरीचा इतिहास बघितला तर बाजारात काही महिन्यात सुधारणा होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. 

 सध्यातरी  गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक करणं टाळायला हवं. इन्ट्रा डे तर कटाक्षाने टाळणं आवश्यक आहे.  सध्याच्या परिस्थितीत इन्ट्रा डे करणं नुकसानीला निमंत्रण असू शकतं. काही चांगले शेअर्स १२ महिन्यांच्या नीचांकावर आले आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली फायदेशीर ठरू शकते. अशा शेअर्समध्ये थोडी थोडी गुंतवणूक करावी. 

ब्लूचीप शेअर्स अशा वेळी गुंतवणुकीसाठी चांगले असतील. सेन्सेक्स आणि निफ्टीतील शेअर्स म्हणजे ब्लूचीप शेअर्स. शेअर बाजार वाढला किंवा पडला हे या शेअर्सवर ठरत असल्यामुळे या शेअर्समध्ये चढ-उतार चालूच असते. खूपच खाली आलेले ब्लूचीप शेअर्समध्ये थोडी थोडी गुंतवणूक काही दिवसांसाठी फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारातील मंदी लक्षात घेता गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे. मात्र कोणत्या कंपनीत आपली रक्कम सुरक्षित असू शकते, याचा अभ्यास गुंतवणूकदारांनी करावा.

पडझडीचा आणि रिकव्हरीचा इतिहास 

 १९९२ मध्ये सेन्सेक्स एका वर्षात ५४ टक्के घसरला. पुढील दीड वर्षात १२७ टक्के सुधारणा झाली.

१९९६ मध्ये ४० टक्के घसरण झाली. मात्र, पुढील एका वर्षात ११५ टक्क्यांची रिकव्हरी झाली. 

२००० पासून पुढील दीड वर्षात ५६ टक्के घसरण झाली. पुढील अडीच वर्षात १३८ टक्के बाजार वधारले. 

२००८ मध्ये एका वर्षात ६१ टक्के बाजार घसरले. आगामी दीड वर्षात १५७ टक्के सुधारणा दिसली. 

२०१० मध्ये २८ टक्के घसरण राहिली. पुढील ३ वर्षात ९६ टक्के रिकव्हरी झाली. 

२०१५ मध्ये १५ टक्के घसरण झाली. पुढील दोन वर्षात ६२ टक्के सुधारणा झाली. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा