सेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी, पहिल्यांदाच 31000चा टप्पा ओलांडला

  Mumbai
  सेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी, पहिल्यांदाच 31000चा टप्पा ओलांडला
  मुंबई  -  

  आठवड्याभरापासून तेजीत असलेल्या सेन्सेक्सने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच 31000 चा टप्पा गाठला आहे. तर निफ्टीही पहिल्यांदाच 9600 च्या जवळपास पोहोचला आहे. मेटल ऑटो, एफएमसीजी, बँकिंग, रिअॅल्टी, ऑइल अँड गॅस, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. दिवसअखेर सेन्सेक्स 278.18 अंकांनी वाढून 31028.21 वर बंद झाला. तर निफ्टी 85.35 अंकांनी वधारून 9595.10 वर स्थिरावला.

  सकारात्मक वाटचाल सुरूच राहणार -
  मागच्या 21 दिवसांमध्ये सेन्सेक्सने 1 हजार अंकांची वाढ नोंदवली आहे. 26 एप्रिल रोजी सेन्सेक्स 30 हजारांवर होता. 21 दिवसांमध्ये तो 31 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. लार्जकॅप शेअर्समध्ये खरेदीचा कल असल्याचा फायदा प्रामुख्याने शेअर बाजाराला झाला आहे. हा कल पुढेही राहण्याची शक्यता असल्याने निफ्टी पुढील आठवड्याभरात 9600 ते 9650 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. देशांतर्गत शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढत आहे. गुरूवारी झालेल्या व्यवहारात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार आघाडीवर होते. यामुळे शेअर बाजाराने उच्चांक गाठला. मान्सून वेळेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने देशांतर्गत बाजारातही सकारात्मक वातावरण आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.