Advertisement

घरबसल्या म्युच्युअल फंडात करा 'अशी' गुंतवणूक

म्युच्युअल फंडाचे फायदे पाहून लोक आता त्यामध्ये गुंतवणूकीचा विचार करीत आहेत. मात्र, बहुतेक लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या पद्धतींबद्दल माहीत नसते.

घरबसल्या म्युच्युअल फंडात करा 'अशी' गुंतवणूक
SHARES

म्युच्युअल फंडाचे फायदे पाहून लोक आता त्यामध्ये गुंतवणूकीचा विचार करीत आहेत. मात्र,  बहुतेक लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या पद्धतींबद्दल माहीत नसते. पण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. इंटरनेटचा वापर करून लोक घरबसल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात.

म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. म्युच्युअल फंड वितरक, दलाल तसंच थेट त्या म्युच्युअल फंड कंपनीकडून योजनेत गुंतवणूक करता येते. आॅनलाइन तसंच आॅफलाइन गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंडात कुठुनही,कोणत्याही वेळी, सहजपणे आॅनलाइन गुंतवणूक करता येते. कम्प्युटर, लॅपटाॅप आणि मोबाइलवरूनही गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो. असे तीन मार्ग आहेत ज्यातून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते.

१) वेेबसाईट

या तीन पैकी एक पद्धत म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन थेट गुंतवणूक करणे. गुंतवणूकीचा हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि त्यातील गुंतवणूक इतर पद्धतींपेक्षा जास्त उत्पन्न देते. अशा प्रकारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांच्या थेट योजना खरेदी करू शकतात. सेबीच्या आदेशानुसार म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या प्रत्येक योजनेत थेट योजनेचा पर्याय देणे आवश्यक असते.

२) स्टॉक ब्रोकर

दुसरा मार्ग म्हणजे स्टॉक ब्रोकरकडे डिमॅट खाते उघडून गुंतवणूक करणे.  एखाद्या स्टॉक ब्रोकरकडे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले असेल किंवा म्युच्युअल फंड विकणाऱ्या वेबसाइटवर खाते असेल तर आपण येथून म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करु शकता. म्युच्युअल फंड स्टॉक ब्रोकरच्या खात्यात ज्या प्रकारे शेअर्स विकत घेतला जातो त्याच प्रकारे खरेदी करता येते.

३)  एजंटद्वारे 

 तिसरा मार्ग म्हणजे एजंटद्वारे  म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. या एजंट्सशी संपर्क साधण्यासाठी आपण म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आपली माहिती भरू शकता. नंतर कंपनी आपल्याशी संपर्क साधते आणि ती आपल्या एजंटकडे पाठवते. त्याशिवाय प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटवर टोल फ्री क्रमांक दिला जातो. या नंबरवर कॉल करून एजंटबद्दल माहिती मिळू शकते. 

जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर बरीच कागदपत्रे द्यावी लागतील. त्यात पॅन, आधार, कॅन्सल चेक आणि फोटो द्यावा लागतो. या कागदपत्रांच्या आधारे गुंतवणूकदाराची केवायसी तयार केली जाते. त्यानंतर गुंतवणुकीत कागदपत्रांची गरज भासत नाही. हेही वाचा -

खूशखबर! स्टेट बँकेत भरणार ८ हजार जागा

क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे? जाणून घ्या...
संबंधित विषय
Advertisement