Advertisement

शेअर बाजारात मुहूर्ताच्या ट्रेडिंगची तयारी सुरू


शेअर बाजारात मुहूर्ताच्या ट्रेडिंगची तयारी सुरू
SHARES

दोनच दिवसांपूर्वी रेकॉर्डब्रेक कामगिरी करणाऱ्या मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारा (एनएसई)ची घौडद्दौड वर्षभर अशीच कायम राहावी या अपेक्षेने सर्व ब्रोकर्स मिळून गुरुवारी सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेदरम्यान संवत 2074 साठी मुहूर्ताचे ट्रेडिंग करतील.


मुहूर्ताचे ट्रेडिंग का?

दिवाळीच्या दिवशी होणाऱ्या या खास ट्रेडींगद्वारे नव्या संवत व्यावसायिक वर्षाची सुरूवात होते. या दिवशी ट्रेडिंग केल्यास समृद्धी येते असं ब्रोकर्स मानतात. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. सायंकाळच्या या तासाभराच्या मुहूर्तावर स्टॉक मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये मुहूर्ताचे व्यवहार होतील.


काय करणार मुहूर्ताला?

मुहूर्तावर शेअर खरेदी, विक्री करण्याला  ब्रोकर्स शुभ मानतात. या दिवशी खरेदी केलेले शेअर्स काही ब्रोकर्स टोकनच्या रूपात दिर्घकाळ जपून ठेवतात, तर काही ब्रोकर्स या शेअर्सची तात्काळ विक्री करून त्यावर नफा कमावतात आणि वर्षभर असाच नफा मिळावा यासाठी प्रार्थना करतात.


मागच्या 3 वर्षांत एनएससीने दिलेला परतावा असा:

30 ऑक्टोबर 2016
0.16%
11 नोव्हेंबर 2015
1.61%
23 ऑक्टोबर 2014
2.56%


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा