Advertisement

मुंबई शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.

मुंबई शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन
SHARES

मुंबई शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले होते की सुरुवातीला त्यांनी 100 ची गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांवर होता, जो आता 60 हजारांच्या पातळीवर व्यवहार करत होते. 

राकेश झुनझुनवाला यांनी ऐंशीच्या दशकात वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. त्यावेळी अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते.

काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या 'अकासा एअर' या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते. राकेश झुनझुनवाला हे मागील काही वर्षांपासून आजारी होते.

प्रकृती खालावल्याने झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा