सेन्सेक्समध्ये 64, तर निफ्टीत 26 अंकांची घट

  Mumbai
  सेन्सेक्समध्ये 64, तर निफ्टीत 26 अंकांची घट
  मुंबई  -  

  देशांतर्गत बाजारात झालेल्या जोरदार विक्रीमुळे बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत घट नोंदवण्यात आली. दिवसअखेरपर्यंत पीएसयू बँक, फार्मा, मेटल, रियाल्टी, कॅपिटल गुड्स आणि पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा कल होता. यामुळे शेअर बाजाराने दिवसाच्या सुरूवातीला मिळवलेली सारी आघाडी गमावली. परिणामी सेन्सेक्स 64 अंकांनी घटून 30302 वर बंद झाला आणि निफ्टी 26 अंकांनी घसरून 9361 वर बंद झाला.

  आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था 'मूडीज'ने 28 वर्षांत पहिल्यांदाच चीनचे मानांकन घटवले आहे. त्यातच भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सावध झाले आहेत. यामुळे निफ्टी 50 मधील 37 शेअर्समध्ये घसरण, तर 14 कंपन्यांचे शेअर्स नाममात्र वाढ नोंदवत बंद झाले. पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये लागोपाठ तीन दिवस घसरण झाली. यामुळे निफ्टीतील पीएसयू बँकेचा इंडेक्स 2.27 टक्क्यांनी घसरला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.