सेन्सेक्स ७५९ ने अापटला

अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम जगभरातील बाजारांवर झाला. अाशियाईही बाजारही कोसळले. परिणामी सेन्सेक्स, निफ्टीने मोठी अापटी खाल्ली.

SHARE

अादल्या दिवशी चांगली उसळी घेतलेले देशातील शेअर बाजार शुक्रवारी मात्र भुईसपाट झाले. सकाळी उघडताना सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही ३३० अंकांची मोठी घसरण नोंदवली. मात्र, त्यानंतर खालच्या पातळीवर झालेल्या खरेदीने सेन्सेक्समध्ये सुधारणा झाली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ७५९ अंकांनी घसरून ३४ हजार १ वर बंद झाला. तर निफ्टी २२५ अंकांची घट नोंदवत १० हजार २३४ वर स्थिरावला. 


अमेरिकी बाजाराचा परिणाम

अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम जगभरातील बाजारांवर झाला. अाशियाईही बाजारही कोसळले. परिणामी सेन्सेक्स, निफ्टीने मोठी अापटी खाल्ली. सेन्सेक्समधील ३१ शेअर्सपैकी २८ शेअर्स घसरले. तर निफ्टीमधील ५० पैकी ४२ शेअर्स नुकसानीत राहिले. टाटा स्टील, एसबीअाय, वेदांता, इंडसइंड बँक, इंडियाबुल्स, इन्फोसिस अादी शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. 


रुपया ७४.४७ वर 

अमेरिकेत व्याजदर वाढल्याने तेथील शेअर बाजारांवर दबाव अाहे. तसंच अमेरिका अाणि चीनमधील  ट्रेड वॉरमुळेही गुंतवणूकदार चिंतेत अाहेत. त्याचा परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून येत अाहे. याशिवाय डाॅलरच्या तुलनेत रुपया ७४.४७ या नीचांकी पातळीवर गेला अाहे. जानेवारीपासून रूपयात सातत्याने घसरण होत अाहे. या वर्षी रुपया १७ टक्के घसरला अाहे.  त्यामुळे शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून अाली. 


संबंधित विषय
ताज्या बातम्या