सेन्सेक्सने गमावली आघाडी


SHARE

मजबूत ग्लोबल संकेत, आशियातील बाजारांची आश्वासक सुरूवात या जोरावर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी सकाळी चांगली आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर नफेखोरीतून झालेल्या शेअर्सच्या विक्रीमुळे सेन्सेक्सने ही आघाडी गमावली. सध्या सेन्सेक्स 117 अंकांच्या वाढीसह 30582 अंकावर व्यवसाय करत आहे.

दिवसाच्या सुरूवातीला एफएमसीजी, मेटल, रियाल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्याने सेन्सेक्सने 247 अंकांची आघाडी घेतली हाेती. शुक्रवारी जीएसटीचे दर निश्चित करण्यात आल्याने बाजारात त्याचे सकारात्मक पडसाद उमटले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांचा कलही त्यामुळे वाढला. आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एल अँड टी, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्याचा हातभार देखील सेन्सेक्सला लागला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या