Advertisement

नोटाबंदीचे शेअर बाजारातही पडसाद


नोटाबंदीचे शेअर बाजारातही पडसाद
SHARES

मुंबई - काळ्यापैशांवर चाप बसण्यासाठी 500 आणि एक हजाराच्या नोटांवर सरकारने बंदी आणल्यानं याचा प्रभाव शेअर बाजार आणि सराफा बाजारात पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सोन्याचे दर वधारले, तर सेंसेक्सच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बुधवारी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेज फंडच्या व्यवसायात तीन टक्क्याने वाढ झाली. तर ग्लोबल इक्विटी मार्केटमध्ये जोरदार घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांनी सोने खरेदीत गुंतवणूक वाढवली. एचडीएफसी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात तीन टक्क्याने वाढ होऊन ती 2 हजार 900 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत पोहचली. सध्या सोन्याच्या दरात चार टक्क्याने वाढ होऊन ती 30 हजार 900 रुपयापर्यंत पोहोचली. दुसरीकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेंसेक्समध्ये 1 हजार 689 ने घसरण झाली. तर निफ्टीत सुरुवातीलाच 541 अंकाने घसरण झाली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा