Advertisement

अय्यो... बीडमधील ३८ वर्षांची महिला देणार २१ व्या बाळाला जन्म

आपल्या आजी किंवा पंजीच्या काळात आठ ते दहा मुलं असणं ही सामान्य बाब असायची. पण आत्ताच्या काळात 'हम दो हमारा एक किंवा हमारी एक' असं म्हणत वाढत्या कुटुंबाला फुलस्टॉप दिला जातो. पण बीडमधल्या माजलगाव शहरात एक महिला चक्क २० वेळा बाळंतिण झाली आहे.

अय्यो... बीडमधील ३८ वर्षांची महिला देणार २१ व्या बाळाला जन्म
SHARES

'हम दो हमारे दो'चा नारा देत भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला गेला. वाढती लोकसंख्या हा तर मुद्दा होताच. पण याहून एखाद्या स्त्रीचं आरोग्य देखील महत्त्वाचं आहे. कारण कुटुंबात एकटया स्त्रीवर मातृत्वाचा आणि देखभालीचा ताण पडतो. यात त्या स्त्रीला आजारपणाचा सामना करावा लागतो. पाळणा लांबवणं-थांबवणं दोन्हीही, स्त्रिया आणि मुलांच्या दृष्टीनं हितकारक आहे. म्हणूनच कुटुंबनियोजनाचं महत्त्व आहे. असं असलं तरी कुटुंब नियोजन पूर्णपणे यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. कारण गावा-खेड्यांमध्ये आजही एक स्त्रीला ५ ते ६ मुलांना जन्म देते. याचं नुकतंच उदाहरण महाराष्ट्राच्या बीडमध्ये सापडलं आहे.  


२० मुलांची आई

आपल्या आजी किंवा पंजीच्या काळात ८ ते १० मुलं असणं ही सामान्य बाब असायची. पण आत्ताच्या काळात 'हम दो हमारा एक किंवा हमारी एक' असं म्हणत वाढत्या कुटुंबाला फुलस्टॉप दिला जातो. पण बीडमधल्या माजलगाव शहरात एक महिला चक्क २० वेळा बाळंतीण झाली आहे. नवल म्हणजे ती आता २१ व्या बाळाला जन्म देणार असून ८ महिन्यांची गरोदर आहे.

लंकाबाई खरात असं या महिलेचं नाव आहे. लंकाबाई यांना यापूर्वी झालेल्या बाळंतपणांपासून ९ मुली आणि २ मुले अशी ११ अपत्ये आहेत. यापूर्वीची ९ अपत्ये बाळंतपण झाल्यानंतर दगावली आहेत.  


आरोग्य विभागाला जाग आली

लंकाबाई २१ व्या वेळा गरोदर असल्याचं कळताच आरोग्य विभागाला जाग आली. माजगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी सहकारी अधिकाऱ्यांसाह त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर लंकाबाई यांना आरोग्य संबंधी जागृत करून तालुक्याच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. स्त्री रोगतज्ज्ञाकडून या महिलेच्या सर्व तपासण्या केल्या आहेत. पुढच्या उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.


पहिल्यांदा रुग्णालयात प्रसुती

धक्कादायक म्हणजे आतापर्यंत या महिलेची प्रसुती घरात होत होती. पहिल्यांदाच तिची प्रसुती रुग्णालयात होणार आहे. घरात प्रसुती करणं हे खरं तर स्त्रीच्या आरोग्यासाठी आणि बाळासाठी देखील धोकादायक आहे. कारण असावेळी जंतूसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. यापूर्वी त्यांची ९ बाळं दगावण्यामागे हे देखील एक कारण असू शकतं.


लातूरमध्येही सारखीच परिस्थिती

लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या अन्सर वाडीत आजही महिलांची १० ते १२ बाळंपतपणं सहज होतात. या गावात गावोगावी भिक्षा मागून जीवन जगणारा गोपाळ समाज राहतो. या गोपाळ समाजामध्ये अशा असंख्य महिला आहेत की त्यांना किमान १५ ते २० मुलांना जन्म दिला आणि ती हयात सुद्धा आहेत. या मुलांची नावं देखील विचित्र ठेवण्यात आली आहेत. भाजी, भाकरी, गांजा, दारु, गोळी, बंदूक, सुपारी अशा नावानं इथं मुलांना बोलावलं जातं. 


गावांमध्ये कुटुंब नियोजन अपयशी का?

) सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर देखील कुटुंब नियोजन आवश्यक असतं. उदाहरणार्थ शेतकरी किंवा श्रमिक कामगाराच्या कुटुंबात श्रम हेच जगण्याचं साधन असल्यानं केवळ एका संततीवर थांबण्याची त्यांची तयारी नसते. दिवसाच्या रोजनदारीवर त्यांना दोनवेळचं जेवण मिळतं. त्यामुळे जेवढे मोठे कुटुंब तेवढे कमवणारे हात जास्त असा दृष्टीकोन ठेवून कुुटुंबात बाळांना जन्म दिला जातो.

) याशिवाय आरोग्य विभागाचा प्रचार आणि प्रसार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पण काही गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये योग्य आरोग्यसेवा न पुरवल्यानं कुटुंब नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत.

) पुरुषप्रधान व्यवस्थेत वारसाहक्क मुलाकडे जातो. यामुळे आहे ती साधनसंपत्ती दुसऱ्या घरी जाऊ न देता आपल्याच घरात राहावी म्हणून मुलगा होणं आवश्यक मानतात. जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत स्त्रीचं बाळंतपण थांबत नाही.



कुटुंब नियोजन समाजाचीही जबाबदारी

आपल्या गजबजलेल्या शहरांपासून ते दूर खेडेगावापर्यंत कुटुंबनियोजनाचा हा संदेश परिणामकतेनं पोहोचला पाहिजे. सरकारनेच काहीतरी याबाबतीत करण्याची वाट पहात स्वस्थ बसून आपल्याला चालणार नाही. सुशिक्षितांनीच लोकमत तयार करून हा संदेश दूरपर्यंत फैलावला पाहिजे. असं झालं तरच ‘कुटुंबनियोजन’ ही एक सामाजिक चळवळ होईल. कुटुंब नियोजन ही काहीतरी भीतीदायक अथवा जबरदस्तीनं लादण्यात आलेली गोष्ट आहे, अशा दृष्टीनं त्याकडे बघणं अयोग्य आहे. कुटुंबनियोजन सुखी, आरोग्यसंपन्न दीर्घायुष्याचं एक साधन म्हणून त्याकडे पाहाणं आवश्यक आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा