Advertisement

लॉकडाऊन : ड्रोनच्या मदतीनं शूट केला मुंबईतील 'टोटल सन्नाटा', एकदा बघाच

COVID 19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे गल्ल्या, रस्ते, रेल्वे सगळंच सुमसाम आहे. मुंबईतील हाच टोटल सन्नाटा शूट केला आहे मुंबई लाइव्हनं...

SHARES

२५ मार्च २०२० पासून भारत लॉकडाऊन अवस्थेत आहे. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीचा रोग थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. खबरदारी म्हणून नागरिक त्यांच्या घरातच राहत आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा सल्ला प्रत्येकाला दिला जा आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात देखील हा सल्ला मानला जात आहे.

मुंबईची लोकसंख्या तर सर्वांनाच माहित आहे. ही लोकसंख्या आज दिर्घकाळापासून घरात बंद आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे इथं गर्दी पाहायला मिळत नाही. एका एतिहासिक घटनेपेक्षा हे कमी नाही. आम्ही हिच घटना ड्रॉनच्या सहाय्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

दररोजची माणसांची गर्दी दिसणाऱ्या या शहरात आज विलक्षण शांतता पाहायला मिळत आहे. एक वेगळीच चमक पाहायला मिळत आहे. ड्रॉनच्या मदतीनं शूट केलेल्या या दृष्यांमध्ये एक विलक्षण आणि आनंददायी बदलाव पाहायला मिळत आहे. कुठे रहदारी नाही, गोंगाट नाही, केवळ आणि केवळ शांतता....

या ड्रोन शूटमध्ये आम्ही सीएसएमटी, चर्चगेट, क्रॉफर्ड मार्केट, फ्लोरा-फाउंटेन, मरीन ड्राईव्ह, नरीमन पॉईंट, वानखेडे स्टेडियम, गिरगाव चौपाटी, दादर, शिवाजी पार्क, सिद्धिविनायक मंदिर, शिवसेना भवन, दादर रेल्वे अशी काही प्रमुख ठिकाणं दाखवली आहेत. स्टेशन, वांद्रे रिक्लेमेशन आणि सी-लिंकचा देखील यात समावेश आहे.

आम्हाला ड्रोननं शूट करण्याची परवानगी दिली यासाठी मुंबई पोलिसांचे आभार...  


COVID-19 संदर्भातल्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.mumbailive.com/mr/




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा