Advertisement

मुंबईत 'इथं' आढळला रहस्यमयी मोनोलिथ

जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये दिसून आलेले मोनोलिथ आता मुंबईत देखील पाहायला मिळत आहे.

मुंबईत 'इथं' आढळला रहस्यमयी मोनोलिथ
SHARES

जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये दिसून आलेले मोनोलिथ आता मुंबईत देखील पाहायला मिळत आहे. डिसेंबरच्या अखेरीस हे मोनोलिथ भारतात अहमदाबाद इथं प्रथम आढळून आलं. त्यानंतर आता मुंबईच्या वांद्रे परिसरातील जॉगर्स पार्क इथं हे मोनोलिथ आढळून आलं आहे.

वांद्रे इथल्या नगरसेवक आसिफ झाकरिया यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. तसंच त्यांनी पुढे मोनोलिथचा अर्थ काय असेल हे शोधून काढले पाहिजे असंही म्हटलं आहे.

काय आहे मोनोलिथ?

मोनोलिथ म्हणजे अखंड दगडी किंवा एखाद्या धातूची वस्तू. मोनोलिथचा वापर प्राचीन काळी मोठ्या वस्तू निर्मितीसाठी केला जात असे. मात्र, काळानुरुप तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि हे मोनोलिथ मागे पडत गेले. मागील काही वर्षांपासून पुन्हा मोनोलिथ आढळायला सुरुवात झाली आहे.


चर्चांना उधाण

मोनोलिथचा वापर हा पर्यटनाला चालना देण्यासाठी किंवा विशिष्ट व्यवसायिक हेतूसाठी करण्यात येतो. मात्र, असं जरी असले तरी यासंदर्भात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात. एलियन्सकडून विशिष्ट संदेश देण्यासाठी किंवा जगावर संकट कोसळेल अशा चर्चा होतात.

मात्र, हे मोनोलिथ विशिष्ट हेतुनेच ठेवली जात असतात हेही आढळून आलं आहे. या मोनोलिथवर भारतातील नॅशनल रिझर्व्ह पार्कचे लॅटिट्यूट आणि लॉन्जिट्यूड दिले आहेत. त्यामुळे याचा वापर नेमका कशासाठी केला आहे? हे रहस्यचं आहे.

मोनोलिथ या थेरीवर आधारीत २००१ : 'अ स्पेस ओडेसी' हा चित्रपट आहे. या चित्रपटात मोनोलिथच्या माध्यमातून पृथ्वीवरील माकडांच्या एका विशिष्ट जातीला संदेश देण्याची कल्पना मांडली आहे. मात्र या सर्व विज्ञानकथा आहेत.


'इथं' सापडला पहिला मोनोलिथ

सर्वात प्रथम मोनोलिथ अमेरिकेच्या वाळवंटात सापडला होता. त्यानंतर अनेकांनी या बातम्या पाहून मोनोलिथची निर्मिती केली आणि रचले गले. भारतमध्ये अहमदाबादनंतर आता मुंबईत मोनोलिथ सापडला आहे. त्याचा स्त्रोत अद्याप माहित नाही.

त्यामागे कुठेतरी '2001 : अ स्पेस ओडेसी' या चित्रपटामध्ये उगम सापडतो. यातून सध्या वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु काळ्या रंगाच्या मोनोलिथपासून सुरू झालेला प्रवास आता धातूच्या मोनोलिथ पर्यंत येऊन पोहोचला आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा