Advertisement

'मिंत्रा'नंतर 'या' ५ ब्रँडचे लोगो बदलण्याची मागणी


'मिंत्रा'नंतर 'या' ५ ब्रँडचे लोगो बदलण्याची मागणी
SHARES

एखादा ब्रँड लक्षात राहण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा विशिष्ट लोगो. या लोगोमुळे ब्रँडला ओळख मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फक्त जाहिरातींचाच भडिमार न करता कंपनी लक्षात राहावी यासाठी लोगोचा निर्माण झाला. जेणेकरून लोगो पाहून कंपनी ओळखतील.

अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर मॅकडोनल्ड आणि आयफोनचं घ्या. यांचा लोगोच पुरेसा आहे त्यांची ओळख करून देण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक ब्रँड लोगोला फार महत्त्व देतो. लोगोला किती महत्त्व आहे हे तुम्हाला मिंत्राच्या लोगोवरून सुरू झालेल्या वादावरून तर कळालंच असेल.

ओवेस्ता फाऊंडेशनच्या कार्यकर्ता नाझ पटेल यांनी डिसेंबर २०२० मध्ये मिंत्राचा लोगो महिलांसाठी अपमानजनक आहे असल्याची तक्रार दाखल केली. त्यावर सायबर क्राईम विभागाच्या डिसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितलं की, महिलांसाठी हा लोगो अपमानजनक आहे, असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीला ई-मेल पाठवला आहे. त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापनानं एक महिन्यात लोगो बदलण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार सर्व ठिकाणचे लोगो बदलले जातील.

पण आता मिंत्रानंतर काही दुसरे लोगो देखील पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत. यामध्ये बायजुज, मास्टरकार्ड आणि दूरदर्शनचा देखील समावेश आहे.

  • दूरदर्शन

७०च्या काळातील दूरदर्शनचा लोगो देखील बदलण्याची मागणी केली जात आहे.

 

  • लुपिन कंपनी

फार्मासिटिकल कंपन्यांमध्ये अग्रगण्य असलेली लुपिन कंपनीचा लोगो पुरुषांसाठी आक्षेपार्ह आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • बायुज कंपनी

ऑनलाईन क्लासेस घेणाऱ्या बायुजचे संस्थापक यांनी स्वत:च्या नावाच्या पहिला अक्षराचा लोगो बनवून घेतला. पण आता ते या लोगोवरून ट्रोल होत आहेत.

  • Airbnb

Airbnbचा लोगो देखील बदलण्याची मागणी केली जात आहे.
 

  • जिमेल

रोजच्या वापरातील gmail चा लोगो देखील मिंत्रासारखाच दिसत असल्यानं तो बदलण्याची मागणी होत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा