Advertisement

अजान वाजणार नाही, पण काकड आरती थांबवू नका, शिर्डीतील मुस्लिम समुदायाची मागणी

शिर्डीतील मुस्लीम समुदायानं मात्र समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

अजान वाजणार नाही, पण काकड आरती थांबवू नका, शिर्डीतील मुस्लिम समुदायाची मागणी
SHARES

भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली. पण याचा फटका इतर धार्मिक प्रार्थनास्थळांना पण बसला. शिर्डीतील साईबाबा संस्थाननं देखील सकाळची काकड आरती आणि शेजारती लाऊडस्पिकरविना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

शिर्डीतील मुस्लीम समुदायानं मात्र समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनंती शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून करण्यात आली आहे.

आम्ही सहापूर्वी मशिदीत होणारी अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिर्डीतील मुस्लीम समाजाची विनंती आहे की, भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरु करावी. शिर्डीतून राज्यात सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्यासाठी ही आरती पुन्हा सुरू करावी, असे निवेदन जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांकडून देण्यात आले आहे.

भोंगे बंद केल्याच्या निर्णयाचा फटका शिर्डीमधील काकड आरतीला बसला आहे. मात्र जामा मशीद अध्यक्ष आणि मुस्लिम बांधवांनी आरती सुरू ठेवण्याची विनंती केली आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुवारी पहाटे स्पिकरविनाच काकड आरती संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची मुभा आहे. त्यामुळे आज काकड आरतीच्यावेळी मंदिरात स्पिकर लावण्यात आला नाही.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील मंदिर आणि मशिदींच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता मुस्लीम समाजाच्या मागणीनंतर शिर्डीच्या मंदिरातील काकड आरतीसाठी विशेष मुभा दिली जाणार का, हे पाहावे लागेल.

शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक देवस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही.हेही वाचा

पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा 'या' २६ मशिदींचा निर्णय

हिंदु-मुस्लिम ऐक्य जपणारे शिर्डीतील साई संस्थान

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा