Advertisement

घरात अनावश्यक वस्तू धूळखात पडल्यात? मग हे वाचा!

आपल्या वापरात नसलेल्या वस्तू घरात अशाच धूळखात पडलेल्या असतात. पण दादर सांस्कृतिक मंचातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे तुमच्या वापरात नसलेल्या वस्तू योग्य हाती जाणार आहेत. 'दादर सांस्कृतिक मंच' आयोजित 'समर्थ व्यायाम मंदीर' यांच्या सहकार्यानं 'देणा-याने देत जावे...' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांंतर्गत तुमच्या वापरात नसलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचणार आहेत.

घरात अनावश्यक वस्तू धूळखात पडल्यात? मग हे वाचा!
SHARES

तुमच्याकडे असणारे कपडे, भांडी किंवा इतर काही सामान सुस्थितीत असलं, तरी आपण सहसा ते भंगारात देतो. कपडे असतील तर ते आपण भांडिवालीला देतो आणि त्या बदल्यात एखाद-दुसरं भांडं घेतो. आपल्याला आवश्यक नसणारं सामान आपण विकतो. पण ते सामान दुसऱ्या कुणासाठी तरी नक्कीच आवश्यक असू शकतं. मग ते कपडे असो वा भांडी किंवा इतर काहीही. हाच विचार करून दादर सांस्कृतिक मंचातर्फे एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


देणाऱ्यानं देत जावं...

बऱ्याचदा आपल्या वापरात नसलेल्या वस्तू घरात अशाच धूळखात पडलेल्या असतात. पण दादर सांस्कृतिक मंचातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे तुमच्या वापरात नसलेल्या वस्तू योग्य हाती जाणार आहेत. 'दादर सांस्कृतिक मंच' आयोजित 'समर्थ व्यायाम मंदीर' यांच्या सहकार्यानं 'देणा-याने देत जावे...' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांंतर्गत तुमच्या वापरात नसलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचणार आहेत. उत्तम स्थितीत असलेल्या वस्तू तुम्ही गरजूंना दान करू शकता.



काय दान करू शकता?

  • चांगल्या स्थितीतील कपडे
  • मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष असे वेगवेगळे केलेले कपडे
  • सुस्थितीत असलेली साहित्य विषयक मराठी पुस्तके (रद्दी नको)
  • घरातील खेळणी
  • घरातील इ वेस्ट


कधी आहे उपक्रम?

तुम्हाला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल, तर दादर इथल्या शिवाजी पार्कच्या समर्थ व्यायाम मंदिरात वस्तू घेऊन यायच्या आहेत. १८ फेब्रुवारीला सकाळी १० ते १ किंवा ४ ते ७ या वेळेत वस्तू स्विकारल्या जातील.



हेही वाचा

मासिक पाळीचा बागुलबुवा किती दिवस? लहान मुलींशी संवाद साधणं गरजेचं!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा