भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे. यशस्वी चंद्र मोहिमेमुळे अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग मिळवणारा भारत हा चौथा देश बनला आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा पहिला देश बनला आहे.
लँडर विक्रमने पॉवर डिसेंट दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अनेक प्रतिमा टिपल्या.
इस्त्रोनं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. चांद्रयान ३ लँडर आणि बंगळुरुतील मॉक्स इस्ट्रॅक मध्ये संपर्क प्रस्थापित झालेला आहे, इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे .लँडरनं पाठवलेले चार फोटो इस्त्रोनं शेअर केले आहेत.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 23, 2023
Updates:
The communication link is established between the Ch-3 Lander and MOX-ISTRAC, Bengaluru.
Here are the images from the Lander Horizontal Velocity Camera taken during the descent. #Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/ctjpxZmbom
चांद्रयान ३ कडून निश्चित स्थळी पोहोचलो असून भारत देखील निश्चित स्थळी पोहोचल्याचा मेसेज करण्यात आला आहे. चांद्रयान -३ चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं आहे, असा मेसेज चांद्रयानाकडून करण्यात आला. याशिवाय भारताचं अभिनंदन असा देखील मेसेज करण्यात आला.
भारताचं चांद्रयान ३ १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान ३ त्यानंतर ४० दिवसात चंद्रापर्यंत पोहोचलं.
बुधवारी सायंकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार ५. ४४ मिनिटांनी ऑटोमेटिक लँडिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. भारताचं चांद्रयान ३ म्हणजेच विक्रम लँडर सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर पोहोचलं. यावेळी सॉफ्ट लँडिंग होताच कोट्यवधी भारतीयांनी जल्लोष केला.
हेही वाचा