कामचुकार 'मामा'

दादर - ट्रॅफिक पोलिस हे चिरीमिरी घेण्यासाठी कुप्रसिद्ध आहेतच, पण आता आम्ही तुम्हाला जे दृश्य दाखवतोय ते त्याहून धक्कादायक आहे. ऑक्टोबर हिट, वाहनांच्या लागलेल्या रांगा यामध्ये ही महिला कर्मचारी एकटीच ट्रॅफिकचे नियोजन करतेय. आता यात काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल, मात्र जरा थांबा. ही महिला एकटीच इकडे ट्रॅफिकचे नियोजन करत असताना हे पहा हे ट्रॅफिक पोलिस मस्त गप्पा मारत बसलेत. हे दृश्य पोलिसांसाठी नक्कीच भूषणावह नाही. तेव्हा कृपया आपल्या महिला सहकाऱ्यांचा मान राखा आणि त्यांना योग्य ती मदत करा हेच मुंबई लाईव्हचे ट्रॅफिक पोलिसांना नम्र आवाहन.

 

Loading Comments