Advertisement

सोने-चांदीचा आजचा भाव काय? जाणून घ्या

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

सोने-चांदीचा आजचा भाव काय? जाणून घ्या
SHARES

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती बदलल्याचा परिणाम भारतातील बाजारावरही दिसून येतो. सोन्याच्या दरात मंगळवारी कोणताही बदल झालेला नाही. असं असलं तरी सोन्याच्या भावात बदल होण्याला जगभरात सुरू असलेलं कोरोनाचं लसीकरण आणि अमेरिकेतील सत्तांतरण हे मुख्य कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम (१ तोळं) सोन्यासाठी ४८,३३० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी हाच दर ४९,३३० रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो ६६,७०० रुपये इतका आहे. याच आठवड्यात २३ जानेवारीला सोन्याच्या दरात २३० रुपयांची मोठी घट नोंदविण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याच्या दरानं पुन्हा उसळी घेतली होती.

मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमसाठी ४८ हजार ३३० रुपये इतका दर आहे. देशाची राजधानी दिल्लीत ४८ हजार ०९० रुपये, चेन्नईत ४६ हजार ३६० रुपये इतका दर आहे. बंगळुरू, हैदराबाद, केरळमध्ये सर्वात कमी म्हणजेच ४५ हजार ९४० रुपये इतका दर नोंदविण्यात आला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा