Advertisement

हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश


हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश
SHARES

महालक्ष्मीच्या हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई हायकोर्टानं महिलांना दर्ग्यात प्रवेश करण्याची परवानगी दिलीय. त्यामुळे आता महिला पुरषांप्रमाणेच मजारपर्यंत जाऊ शकतात. हायकोर्टाच्या या निर्णयाचं महिलांनी स्वागत केलंय. मात्र या निर्णयाविरोधात हाजी अली ट्रस्ट सुप्रिम कोर्टात धाव घेणार आहे. हायकोर्टाने सुप्रिम कोर्टात जाण्यासाठी हाजी अली ट्रस्टला सहा आठवड्यांची मुदत दिलीय. मात्र या सहा आठवड्यात महिलांना आत प्रवेश करता येणार नाही.

पुरुषांप्रमाणे महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई 28 ऑगस्टला हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच पोलिस बंदोबस्तात हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं होतं. जिथपर्यंत महिलांना प्रवेश आहे तिथपर्यंतच तृप्ती देसाईंना प्रवेश देण्यात आला होता.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा