ट्रेनमध्ये बदललेली बॅग दिली परत


SHARE

शिवडी - बेलापूर ते सीएसटी प्रवास करणाऱ्या एस. सिंग यांची बदली झालेली बॅग वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांना परत मिळाली आहे. सिंग कुलाब्याला राहतात. काही कामानं ते बेलापूरला गेले होते. सीएसटीला परत येताना शिवडी स्थानाकत त्यांना बॅग बदलली गेल्याचं लक्षात आलं. बॅग काळ्या रंगाची असून त्यामध्ये रोख रक्कम 55 हजार रुपये, पासपोर्ट आणि ओळखपत्र असल्याची तक्रार त्यांनी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली. लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शोध सुरू केला आणि तासाभरातच त्यांच्या बॅगेचा शोध लागला. ही बॅग शत्रुघ्न पटेल यांच्या बॅगेबरोबर बदलली गेली होती. लोहमार्ग पोलिसांनी योग्य ती खातरजमा करून ही बॅग सिंग यांना परत केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या