'मासिका महोत्सव' म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी वाचा


'मासिका महोत्सव' म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी वाचा
SHARES

मासिक पाळी विषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. त्याचा नाहक त्रासही अनेक महिलांना सहन करावा लागतो. त्रास होत असला, तरी महिला याविषयी स्पष्टपणे बोलणं टाळतात. पण महिलांचा आणि इतरांचा देखील मासिक पाळी विषयीचा हा दृष्टीकोन बदलण्यासाठी 'म्युज' या तरूणांच्या एका ग्रुपनं पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षापासून 'म्युज'तर्फे मासिका महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. पहिल्या वर्षी मुंबई-ठाणे, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये हा महोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र, यावर्षी मुंबई-ठाण्यासह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात या ठिकाणी देखील हा महोत्सव सुरू झाला आहे.


तीन दिवसांचा महोत्सव

ठाण्यातील 'म्युज' या संस्थेद्वारे 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' या उपक्रमातून भारतामध्ये महिलांच्या मासिक पाळीबद्दल असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर होण्यासाठी मासिका महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या निमित्तानं २१ ते २८ मे २०१८ दरम्यान विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. ठाण्यातील मनोरमा नगर परिसरामध्ये २३२६ आणि २७ या दिवशी हा महोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये महिलांसाठी फुटबॉल स्पर्धेसोबतच अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


२३ तारखेला होणारे कार्यक्रम

कार्यक्रम - सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक सादरीकरण, जनजागृती करणारी व्याखानं

वेळ - संध्याकाळी ४.३० नंतर

कुठे? - बौद्ध विहार, शिवसेना शाखा, मनोरमा नगर, कोलशेत रोडठाणे


२६ तारखेला होणारे कार्यक्रम

कार्यक्रम - महिलांची फुटबॉल स्पर्धा (किक द टॅबो)

वेळ – सकाळी ९.३० वाजल्यानंतर

कुठे? - ड्रिबल्स फर्स्ट फ्लोअर, विवियाना मॉलठाणे


२७ तारखेला होणारे कार्यक्रम

कार्यक्रम – योगासन

वेळ – सकाळी ६.१५ वाजता

कुठे? - म्युझिकल गार्डन, उपवन तलावठाणे


आजही २१व्या शतकात मासिक पाळी आलेल्या महिलांना अस्पृश्य असल्यासारखी वागणूक दिली जाते. पाळी आलेल्या महिलेला एका कोपऱ्यात बसवणंघरातल्या वस्तूंना हात न लावणं असे अनेक नियम तिच्यावर लादले जातातपाळी विषयीचा हाच दृष्टीकोन बदलण्यासाठी आम्ही मासिका महोत्सव सुरू केलाया अंतर्गत महिलांनी पाळी दरम्यान एका कोपऱ्यात बसण्याची काही गरज नाहीपाळी सुरू असेल तरी तुम्ही सर्व काही कर शकताम्हणून या महोत्सवात आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांपासून ते स्पोर्ट्स गेम असे अनेक कार्यक्रम ठेवतो.

निशांत बंगेरासंस्थापक


म्युजविषयी थोडक्यात

सामाजिक भान जपण्याच्या उद्देशानं ठाण्यातील तरुणांनी म्युज ग्रुपची सुरुवात केली. तीन ते चार वर्षांपासून ते विविध उपक्रम राबवत आहेतग्रामीण आदिवासी मुलींना मासिक पाळीविषयी जनजागृती करून त्यांना पॅड पुरवण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू होते. मासिक पाळीविषयी असणाऱ्या गैरसमजुतींना बगल देण्यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग'या उपक्रमाची त्यातून सुरुवात झाली. त्यातूनच पुढे मासिका महोत्सव या संकल्पनेचा जन्म झालाहेही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!


संबंधित विषय