Advertisement

रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जींना गुगलची श्रद्धांजली


रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जींना गुगलची श्रद्धांजली
SHARES

भारताला स्वातंत्र्यही मिळालं नव्हतं, तेव्हा एका मुलीनं रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. या मुलीचं नाव होतं असीमा चॅटर्जी. १९२० च्या दशकात मुलींना घरातून बाहेरही पाठवलं जात नव्हतं. त्या काळात असीमा यांनी संघर्ष आणि शिकण्याची जिद्द मनात ठेऊन रसायनशास्त्रात डॉक्टरेटची पदवी मिळवली. भारतात ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिली महिला ठरल्या.

त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९१७ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने गुगलनेही डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.


१९३६ मध्ये त्यांनी ऑर्गेनिक रसायनशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर १९४४ मध्ये डॉक्टरेटची पदवी मिळवली.

चॅटर्जी यांनी वनस्पतीचे औषधी गुणधर्मी आणि जैविक रसायन विज्ञानावर बरेच संशोधन केलं. त्यांच्या संशोधनातूनच पुढं मलेरियावरील उपचारात वापरण्यात येणारी आणि किमोथेरपीत वापरण्यात येणारी औषधे तयार झाली. 

वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांना भारतीय विज्ञान काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. याचसोबत १९७५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. फेब्रुवारी १९८२ ते मे १९९० पर्यंत राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभा सदस्यत्वसाठी नियुक्त केलं होतं. डॉक्टर असीमा यांचे २००६ मध्ये ९० व्या वर्षी निधन झाले.

२३ सप्टेंबरला त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने गुगलनेही डुडलच्या माध्यमातून असीमा यांना श्रद्धांजली वाहिली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा