Advertisement

ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!

मराठी माणसाला उद्योग जमत नाही हे गृहीतक आता इतिहासजमा झालंय. आता पुरुषच नाही तर अनेक मराठी स्त्रियांनीही उद्योग क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी केलीय.

SHARES
01/6
ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!
स्त्रीचं व्यक्तीमत्व तिच्या कर्तबगारीनं आणि धाडसानं विकसित होतं. आपल्या देशातील अशाच काही कर्तबगार स्त्रिया आहेत ज्यांनी पुरूषप्रधान संस्कतीमध्येही स्वत:च्या मेहनतीनं, चिकाटीनं आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून धैर्यानं यश प्राप्त केलं आहे. अशाच काही कर्तबगार महिलांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
02/6
ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!
यशोधरा पेंडसे, दातांची डॉक्टर डॉक्टरकी आणि केटरिंग हे व्यवसाय दोन टोकांवर… पण यशोधरा यांनी तितक्याच समर्थपणे हे दोन्ही व्यवसाय पेलले. प्रॅक्टिस सांभाळून चक्क केटरिंगचा व्यवसाय त्या सांभाळतात. अगदी प्रतिष्ठीत उद्योगपतींच्या घरून त्यांच्या पदार्थांना मागणी येते! मुंबईच्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण करून, 1982 साली डिग्री मिळवली. लगेच, 1983 मध्ये शुभमंगल आणि 1985 पासून दंतवैद्यकीच्या व्यवसायाचा शुभारंभ... तेव्हापासून तिने तो व्यवसाय जपला आहे. दंतवैद्यकीत जम बसला, तरी यशोला पाककलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. यशोचे प्रयोग दुपारच्या मोकळ्या वेळी सुरू झाले. तिच्या हाताची चव, तिचा उरक आणि पदार्थाची विविधता यांची कीर्ती पसरू लागली आणि ऑर्डरी देण्या-घेण्यासाठी तिच्या घराबाहेर गाड्या थांबू लागल्या.
03/6
ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!
गुणाबाई, खेकडा व्यवसायिका नवी मुंबईच्या छोट्याश्या खाडी किनाार्‍यावर एका महिलेनं घाम गाळून चक्क खेकडे परदेशी निर्यात करण्यास सुरवात केली. नवी मुंबईतल्या वाशी गावात गुनाबाई आणि त्यांचे अडीच-तीन किलोचे खेकडे प्रचंड लोकप्रिय. पण फक्त मुंबईतच नाही तर परदेशातही. अगदी घरा-घरात आणि हॉटेलांमध्येही गुनाबाईंच्या खेकड्यांची चव पोहोचलीये. हॉटेलांमध्ये ५ ते २० किलोपर्यंत खेकड्यांची मागणी असते. तर परदेशात ५०० किलोपर्यंतचे खेकडे पोहोचवले जातात. गुणाबाई सुतार यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पहिले. या व्यवसायात नुकसानही सहन करावे लागले. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही आणि आपला खेकडी मासे विकण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला.
04/6
ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!
जयंती कठाळे, केटरिग व्यवसाय मोठे स्वप्न उराशी बाळगून मराठ मोळ्या जयंती कठाळे या आज एक यशस्वी महिला उद्योजिका बनल्या आहेत. आयटीमधील नोकरीचा त्याग... कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच एक दिवस त्यांनी आयटीतील सुखाची नोकरी सोडविण्याचे ठरवले आणि बंगलुरु शहरात ‘पुर्णब्रह्म’ नावाचे हॉटेल सुरु केले. मराठी माणसाकडे स्वयंपाकातील इतकी चांगली कला आणि परंपरा असताना ते पदार्थ अमराठी माणसांपर्यंत आणि परदेशात का पोहोचू नयेत या एका ध्येयानं त्यांचा हा प्रवास सुरू झाला. मराठमोळे पदार्थ खाण्याची आणि खिलवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी बंगलुरुमधल्या अमराठी लोकांनाच काय, तर परदेशातल्या फिरंग्यांनाही त्यांच्या हातचे जेवण आवडू लागले.
05/6
ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!
अनिता डोंगरे, फॅशन डिझायनर मराठमोळ्या फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी फॅशनच्या क्षेत्रात स्वत:चं नाव कमावलं आहे. त्यांच्या फॅशनच्या ब्रॅंड्सपैकी 'अॅन्ड' आणि 'ग्लोबल देसी' हे दोन ब्रॅन्ड्स सध्या देशाच्या पन्नासहूनही जास्त शहरात प्रसिद्ध आहेत. तसंच नुकत्याच नावलौखिक मिळवलेल्या 'अनिता डोंगरे ग्लासरूट' या ब्रॅन्डसाठी देशातील कुशल कारागिरांसोबत काम करून विणलेल्या नक्षीकामाचे डिझाईन केलेले कपडे त्यांनी सादर केले होते.
06/6
ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!
मीनल मोहाडिकर, मार्केटिंग महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला व्यावसायिक आणि उद्योजक आहेत. सर्वसामान्य उद्योगिनींसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून ८ मार्च १९९७ मध्ये 'आम्ही उद्योगिनी' या संस्थेची स्थापना करण्यात आली. मीनल यांनी कधीही मार्केटिंगचे वेगळे शिक्षण घेतले नव्हते. परंतु अनुभवाने त्यांनी मार्केटिंगच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा