Advertisement

17 वर्षांपासून मुलांना मोफत शिकवणारा अवलिया!

ज्या विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येतं, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना जॉन या ठिकाणी शिकण्याची संधी देतात. पैसे नसले तरी हरकत नाही, पण शिक्षण घेऊन काम करण्याची इच्छा असली, की या ठिकाणी प्रवेश पक्का, असे विद्यार्थ्यांनी समजायला हरकत नाही.

17 वर्षांपासून मुलांना मोफत शिकवणारा अवलिया!
SHARES

परेलच्या जोसेफ कार्डियन टेक्निकल स्कूलचे मुख्याध्यापक जॉन अल्मेडा शब्दश: आदर्श शिक्षक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अल्मेडा परेलच्या जोसेफ कार्डियन टेक्निकल स्कूलमध्ये 2000 सालापासून कार्यरत आहेत. गेल्या 16 वर्षांपासून कोणतंही मानधन न घेता मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडत असताना समाजातील प्रत्येकाला जीवन जगण्याचा, उत्तम शिक्षण घेऊन नोकरी करण्याचा अधिकार आहे. यासाठी जॉन यांनी 15 वर्षांपूर्वी या टेक्निकल स्कूलमध्ये एसी रिपेअरिंगचा मोफत कोर्स सुरू केला. 

ज्या विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येतं, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना जॉन या ठिकाणी शिकण्याची संधी देतात. पैसे नसले तरी हरकत नाही, पण शिक्षण घेऊन काम करण्याची इच्छा असली, की या ठिकाणी प्रवेश पक्का, असे विद्यार्थ्यांनी समजायला हरकत नाही. इथे वर्षातून 2 बॅच घेतल्या जातात.



जॉन यांच्या मते कुणीही बेरोजगार असू नये, अडाणी असू नये! या देशातल्या प्रत्येक तरुण आणि तरुणीला नोकरी मिळेल, अशा प्रकारचं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. जॉन यांनी मोफत एसी रिपेअरिंग कोर्स सुरू केल्यापासून या ठिकाणी शिक्षण घेतलेले 90 टक्के विद्यार्थी आज नोकरी करत आहेत. जोसेफ कार्डियन टेक्निकल स्कूलमधला हा एसी कोर्स जॉन यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला एकमेव मोफत कोर्स आहे.

जॉन यांच्यामुळे मोफत शिकलेले अनेक विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद ठेवतात. तसेच कुठेही नोकरीच्या संधी असतील, तर या विद्यार्थ्यांना सांगतात. या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी जॉन यांनी ओलटास कंपनीशी सहकार्य करारही केला आहे. बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जॉन यांनी मुंबईत रहाण्याची मोफत सोयदेखील केली आहे.

जॉन अल्मेडा यांनी वयाच्या 27 व्या वर्षी गुरु दीक्षा घेतली आणि फादर होऊन चर्च सांभाळत समाजासाठी काम करायचा निर्णय घेतला. जॉन सांगतात दरवर्षी एसी कोर्सचे 2 विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. आतापर्यंत 550 विद्यार्थ्यांनी या कोर्स द्वारे मोफत प्रशिक्षण दिले आहे.

फक्त शिक्षणच नाही, तर पोटापाण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या अनेक लोकांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायला जॉन यांनी आर्थिक मदत केली आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांनाही ते औषध खर्चासाठी आर्थिक मदत करतात. त्यांनी धारावीतल्या महिलांना ढोल पथकासाठी ढोल खरेदीसाठी मदत केली होती. त्या महिलांचे ढोल पथक आज त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरले आहे.



हेही वाचा

'तिनं' भल्याभल्यांनाही विचार करायला लावलंय!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा