Advertisement

लडाख ऑन टू व्हील; १९ वर्षीय कनकाचा थक्क करणारा प्रवास

बाईक रायडिंग ही फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे, हा अनेकांचा गैरसमज ठाण्याच्या कनकानं दूर केला आहे. पुरुषांच्या मक्तेदारीला आवाहन देत कनकाच्या खडतर प्रवासाला आता कुठे सुरुवात झाली आहे.

लडाख ऑन टू व्हील; १९ वर्षीय कनकाचा थक्क करणारा प्रवास
SHARES

एखादी महिला रायडर बाईक चालवत असेल तर सर्वांच्याच माना आपसुक तिच्याकडे वळतात. कुणी बाईक तर कुणी चक्क बुलेटचा धडधडाट करतं... कुणी पॉवरबाईक, तर अगदी स्कूटरदेखील दिमाखात मिरवतात. तरीही बाईक रायडिंग ही फक्त पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. पण ठाण्यात राहणारी १९ वर्षीय कनका शेट्टी पुरुषांच्या या मक्तेदारीला आव्हान देत आहे



ठाणे ते लडाख

व्हाय शूड बॉईज हॅव ऑल द फन हा प्रश्न उपस्थित करत कनका शेट्टीनं एक धाडसी निर्णय घेतला. वयाच्या १९ वर्षी स्त्री-पुरुष समानता या विषयाकडं गांभीर्यानं पाहणाऱ्या कनकानं थेट १६ दिवसांमध्ये ठाणे ते लडाख ही ट्रीप पूर्ण करत विक्रम केला आहे. तुम्ही म्हणाल यात काय एवढं? ते तर कुणीही करू शकतं. पण एकच मिनिटं. लेगच जजमेंटल होऊ नका. तिच्या या रोड ट्रिपची खासियत म्हणजे ६ हजाराहून अधिक किलोमीटरचं अंतर कनकानं चक्क बाईकनं पार केलं आहे. एकट्या मुलीनं एवढं अंतर पार करणं म्हणजे कमालचं आहे.



खडतर प्रवास १६ दिवसात

कनकाचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. डोंगररांगातून जाणाऱ्या वाटा, नदीच्या प्रवाहासोबत चालणारा रस्ता, दऱ्या-खोऱ्यातील वाट या साऱ्यातून मार्ग काढत जात कनकानं लक्ष्य गाठलं आहे. ठाण्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात तिनं उदयपूर-हिसार-चंदिगढ-कटरा-बनिहाल-द्रास-लेह-खारदुंगला-पँगाँग त्सो-जिस्पा-मनाली-भटिंडा-उदयपूरमार्गे पुन्हा ठाणे गाठलं. असा हा खडतर प्रवास तिनं १६ दिवसांमध्ये पूर्ण केला.



मुलगा आणि मुलीमध्ये करण्यात येणाऱ्या भेदभावाची मला प्रचंड चीड येते. मुलं जे करू शकतात ते मुलीही करू शकतात. पण बाईक रायडिंग हा प्रकार फक्त मुलंच करू शकतात असा गैरसमज अनेकांना आहे. पण ठाणे ते लडाख हा प्रवास करून मी गैरसमज दूर केला आहे.

- कनका शेट्टीमहिला बाईक रायडर



लहानपणापासून बाईकची आवड

 कनकाला लहानपणापासून अॅक्टिव्हा आणि बाईक चालवायची आवड आहे. दहा-अकरा वर्षांची असताना ती सर्व प्रकारच्या टू व्हिलर्स चालवायला शिकली होती. पण पुढे जाऊन तिला प्रतिक मसुरकर आणि दर्शन रघुनाथ या तिच्या दोन मित्रांमुळे बाईक रायडिंगचं वेड लागलं. पुढं जाऊन कनिकानं त्यांचाच रायडिंग अॅण्ड टूरिस्ट स्कॉट हा ग्रुप जॉईन केला. त्यानंतर त्यांनी लडाख ट्रीप करायचा निर्णय घेतला



दिवस-रात्र रस्त्यावरच

१६ दिवसांचा प्रवास कनकासाठी सोपा नव्हता. अनेक समस्यांचा सामना तिनं केला. प्रवासाच्या आठवणीबद्दल कनका बोलली की, पँगाँग त्सोला आम्ही जात असताना पावसामुळे आम्ही एका ठिकाणी अडकलो. पावसामुळे नदीच्या प्रवाहातून जाणारा रस्ता हा पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे आम्हाला पूर्ण दिवस आणि एक रात्र रस्त्यावरच रहावं लागलं होतं. १६ दिवसांमध्ये अशा अनेक गोष्टींचा आम्ही सामना केला. शिवाय या प्रवासामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. नवीन ओळखी झाल्या. नवीन गोष्टी समजल्या, त्यामुळे ही ट्रिप मी कधीच विसरणार नाही.



कनकाचा विश्वविक्रम

बाईक राईडसारख्या गोष्टींसाठी घरातील मुलगी बाहेर पडली काय किंवा एखाद्या लांबच्या प्रवासासाठी ती बाहेर पडली काय घरातल्यांना चिंता लागून राहिलेली असते. तशीच काहीशी चिंता कनकाच्या आई-वडिलांना पण होती. पण त्यांचा कनकावर विश्वास होताकनकानं याच विश्वासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर इतका लांबचा प्रवास शक्य करून दाखवला. अवघ्या सोळा दिवसांमध्ये पूर्ण केलेल्या या प्रवासाची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे.



इंटरनॅशनल ट्रीप करणार

१९ वर्षीय कनकाची ही सुरुवात आहे. पुढे जाऊन कनका लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणार आहे. लडाखनंतर ती इंटरनॅशनल ट्रीप करणार आहे. कनकाच्या पुढच्या प्रवासासाठी मुंबई लाइव्हकडून शुभेच्छा... जिद्द आणि साहसीवृत्तीच्या जोरावर ती तिच्या प्रत्येक प्रवासात यशस्वी होईल यात काही शंका नाही.


हेही वाचा

पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या 'बायकरणी'!




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा