Advertisement

पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या 'बायकरणी'!

महिलांच्या या जोष आणि जिद्दीमागे हात आहे तो उर्वशी पाटोले यांचा. उर्वशी या स्वत: एक बायकर आणि रेसिंग चॅम्पियन आहेत. २०११ साली त्यांनी 'बायकरणी' नावाची संस्था काढली. 'बायकरणी' देशातील पहिलाच बाईकस्वार महिलांचा गट आहे ज्यांनी मोटरसायकलने दिल्ली-लदाख-खारदुंगला पासपर्यंतचा प्रवास केला आहे.

पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या 'बायकरणी'!
SHARES

ब्लॅक कलरचं लेदर जॅकेट, हातात रायडिंग ग्लव्ह्ज, डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यावर हेल्मेट... ब्रुssम...ब्रुssम आवाज करत बाईकर्सचा फौजफाटा निघाला...१५ ते २० जणांची गँग... बाईक रायडिंग ही फक्त पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. पण या महिला बिनधास्त आणि बेधडकपणे पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देत आहेत!



महिलांच्या या जोष आणि जिद्दीमागे हात आहे तो उर्वशी पाटोले यांचा. उर्वशी या स्वत: एक बायकर आणि रेसिंग चॅम्पियन आहेत. २०११ साली त्यांनी 'बायकरणी' नावाची संस्था काढली. 'बायकरणी' देशातील पहिलाच बाईकस्वार महिलांचा गट आहे ज्यांनी मोटरसायकलने दिल्ली-लदाख-खारदुंगला पासपर्यंतचा प्रवास केला आहे.



लिम्कामध्ये 'बायकरणी'ची नोंद

२०११ मध्ये उर्वशी यांनी एक फेसबुक पेज तयार केले आणि त्याचे नाव 'बायकरणी' ठेवले. पहिल्यांदा पंधरा जणी या गटात जोडल्या गेल्या. हळूहळू त्यांचे सदस्य वाढले आणि त्यांची संख्या चाळीसपर्यंत पोहोचली. तेव्हा सर्व जणी बाईकवरून रायडिंगला जाऊ शकतो असी संकल्पना उर्वशीला सुचली. उर्वशीनं रॉयल एनफिल्ड कंपनीशी चर्चा केली तेव्हा त्यांनी आनंदानं होकार दिला. त्यानुसार 'बायकरणी' गटाच्या अकरा जणींनी सप्टेंबर २०११ साली दिल्ली ते खारदुंगलापर्यंतचा प्रवास बाईकनं केला. यापूर्वी मुलींचा कुठलाच गट तिथे पोहोचला नव्हता. त्यामुळे त्यांचे नाव 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवण्यात आले



'बायकरणी'चा उद्देश

'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाल्यानंतर 'बायकरणी' ग्रुप प्रसिद्ध झाला. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, हैद्राबाद आणि कोलकाता इथं 'बायकरणी'चे ग्रुप करण्यात आले आहेत. १५ मुलींपासून सुरू झालेल्या प्रवासात आता ७०० पेक्षा जास्त स्त्रिया सहभागी झाल्या आहेत. 'बायकरणी'चा मुख्य उद्देश बाईकच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण करणे हा आहे. मुली कोणतेही काम करू शकतात आणि त्यांना कोणतीही मर्यादा नाही, या हेतूनेच 'बायकरणी'ची स्थापना करण्यात आली.



तुम्हाला व्हायचंय सहभागी?

'बायकरणी' या गटात महाविद्यालयीन तरूणींपासून ते साठ वर्षाच्या आजींपर्यंतच्या महिला सहभागी होतात. अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधीत महिला सदस्या, महिला पत्रकार आणि व्यावसायिक महिलाही आहेत. जास्तीत जास्त महिलांनी त्यांच्या या उपक्रमात सहभागी व्हावं, यासाठी 'बायकरणी' प्रयत्नशील आहे.



'बायकरणी' या ग्रुपने आत्तापर्यंत अनेक शहरांमध्ये भ्रमंती केली आहे. जर तुम्हाला देखील काही तरी साहसी करायचं असेल, तर नक्की 'बायकरणी' या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeB6xqLdt8-0wsdpfvc48T_VHPaM2fzKf0H7zX5njDN_xtLKg/viewform या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता



हेही वाचा

पार्टनरसोबत करा मिडनाईट 'ट्विन सायकल राईड'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा