Advertisement

पार्टनरसोबत करा मिडनाईट 'ट्विन सायकल राईड'!

तुम्ही बाईकवरून नेहमीच लाँग ड्राइव्हवर जात असाल. यावेळी सायकलवरून लाँग ड्राइव्हला जाण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. पहिल्यांदाच मुंबईत 'ट्वीन सायकल राईड'चं आयोजन करण्यात आलं आहे.

पार्टनरसोबत करा मिडनाईट 'ट्विन सायकल राईड'!
SHARES

जोडीदारासोबत या वीक-एण्डला काही तरी तुफानी करायचं आहे? नेहमीच डेटवर किंवा चित्रपट पाहायला जातो. आता तेच तेच करून कंटाळा आला आहे. पण नेमकं काय करायचं, हेच कळत नाही. मग तुमच्यासाठीच वीक-एण्डला एक जबराट प्लॅन आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला सायकल चालवायला आवडत असेल, तर यावेळी तुम्ही वेगळा अनुभव घेऊ शकता. तुम्ही बाईकवरून नेहमीच लाँग ड्राइव्हवर जात असाल. यावेळी सायकलवरून लाँग ड्राइव्हला जाण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. पहिल्यांदाच मुंबईत 'ट्विन सायकल राईड'चं आयोजन करण्यात आलं आहे.



ट्विन सायकलिंग म्हणजे काय?

ट्विन सायकल म्हणजे डबल सीटर सायकलिंग. या सायकलवर दोन जणं बसू शकतात अशी व्यवस्था असते. ट्विन सायकल राईडची संकल्पना 'ट्विन ट्रिंग' या कंपनीची आहे. हर्ष मंदाविया आणि अभिनव कोठारी यांनी सुरु केलेल्या कंपनीनं मिडनाईट ट्विन सायकल राईडचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमध्ये फक्त सायकलिंगचाच अनुभव मिळणार नाही, तर जोडिदारासोबत तुम्ही वेगवेगळ्या गेम्सचाही भाग होऊ शकता.



सायकल राईडचा मार्ग

कुलाबा, गेटवे ऑफ इंडिया, बीएमसी मुख्यालय, सीएसटी, मरीन ड्राइव्ह, चौपाटी, हाजी अली, आणि एनएससीआय स्टेडियम असा या सायकल राईडचा मार्ग आहे. पुन्हा याच मार्गानं रिटर्न यायचं आहे. ३१ मार्च, ७ एप्रिल आणि १४ एप्रिल असे तीन दिवस तुम्ही या राईडमध्ये सहभागी होऊ शकता. रात्री ११.३० वाजता या राईडला सुरुवात होईल.


'ट्विन ट्राइंग' या कंपनीतर्फे तुम्हाला २४ गेअरची सायकल देण्यात येईल. ही ट्विन सायकल 200 किलोपर्यंतचं वजन आरामात झेलू शकते. सायकल राईडसाठी आवश्यक असणारं साहित्य देखील पुरवण्यात येईल. यासोबतच सँडविच, हॉट चॉकलेट, एनर्जी ड्रिंक, प्रोटिन बार असं खाण्या-पिण्याचं साहित्य देखील पुरवण्यात येईल. प्रत्येकाला त्यांचे फोटो आणि गोप्रो रेकॉर्डिंग देण्यात येईल.

फक्त यासाठी एकाचे १५०० रुपये असे दोघांचे ३००० रुपये मोजावे लागतील. अधिक माहितीसाठी तुम्ही हर्ष मंदाविया (९९२०८९५०९०) आणि अभिनव कोठारी (९८२०७६०६८४) यांच्याशी संपर्क साधू शकता.



हेही वाचा

मुंबई-पुणे सायकल शर्यतीत दिलावरजी बाजी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा