Advertisement

हिमाचलची भटकंती करायची आहे? मग खास महिलांसाठी ही ट्रिप!


हिमाचलची भटकंती करायची आहे? मग खास महिलांसाठी ही ट्रिप!
SHARES

निसर्गाच्या मुक्त वरदहस्तानं नटलेलं नितांतसुंदर पर्यटन स्थळ अशी हिमाचलची ओळख! आयुष्यात एकदा तरी हिमालय पाहावा अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. पण हिमाचलसारख्या ठिकाणी जायचं तर कंपनी हवीच. मग कुणी आपल्या कुटुंबासोबत जातं, कुणी मित्र-मैत्रिणींसोबत, तर कुणी एकटंच जातं. पण सर्वच तसे नसतात. खास करून मुली थोडं एकटं फिरायला सरसावत नाहीत. खूप क्वचितच मुली कुठल्याही कंपनीशिवाय एकट्या भटकंती करतात. यासाठीच हायकिंग इंडियानं पुढाकार घेत महिलांसाठी एक मोहीम सुरू केली आहे.


नक्की काय आहे मोहीम?

#VentureLikeAGirl या हॅशटॅग अंतर्गत हायकिंग इंडियानं ही मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत हायकिंग इंडियानं हिमाचलसाठी सोलो ट्रिप आयोजित केली आहे. ही ट्रिप फक्त खास महिलांसाठी असणार आहे. या ट्रिपमध्ये ना तुम्हाला कुटुंबातल्या सदस्यांची गरज आहे ना मित्र-मैत्रिणींची. तुम्ही एकटं आपला बोजाबिस्तरा उचलायचा आणि चालू पडायचं. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर तुमची ओळख इतर महिला ट्रेकर्सशी करून दिली जाईल.


कधी आहे ट्रिप?

२० ते २४ जानेवारी २०१८ अशी चार दिवसांसाठी ही ट्रिप आयोजित करण्यात आली आहे. हायकिंग इंडियातर्फे ट्रेकिंगसाठी आवश्यक सर्व साहित्य पुरवण्यात येणार आहे. याशिवाय राहण्याची आणि खाण्याची सोय देखील हायकिंग इंडियातर्फे करण्यात येणार आहे. एवढ्या सोई-सुविधा हायकिंग इंडियाकडून देण्यात येत आहेत म्हणजेच रग्गड पैसा भरावा लागणार. पण या ट्रिपची फी ऐकाल, तर तुम्ही आत्ताच नोंदणी कराल. फक्त ७५०० रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. ट्रिपसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी हायकिंग इंडिया या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊ शकता.


मोहिमेचा उद्देश

महिलांनी आपल्या मनातील भिती दूर सारावी आणि अशा ट्रिपमध्ये एकटे का होईना पण पुढाकार घ्यावा, बिनधास्त आवडेल त्या ठिकाणाची भटकंती करावी, महिला सशक्त आहेत हे समाजाला दाखवून द्यावं, हा या मोहिमेचा उद्देश आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा