Advertisement

मुंबईत रंगला माणदेशी महोत्सव, अनुभवा गावातील संस्कृती

माणदेशातील महिलांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या व्यवसायाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम माण फाऊंडेशनने केले आहे.

मुंबईत रंगला माणदेशी महोत्सव, अनुभवा गावातील संस्कृती
SHARES

दोन वर्षांच्या कालावधीनंतर मुंबईत साताऱ्यातील पाचवा माणदेशी महोत्सवास सुरवात झाली आहे. माणदेशातील महिलांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या व्यवसायाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम माण फाऊंडेशनने केले आहे.

महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा आविष्कार ‘गझी नृत्य’ पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरून उलगडणार आहेत.

या महोत्सवात स्वतःहा कुभांरकाम करण्याचा आनंद घेऊ शकता, स्वत: लाटणं तयार करुन घ्या, लाखेच्या बांगड्या बनवून घ्या, टोपली किंवा झाडू वळवून घ्या, ही सारी काही गावातली संस्कृती येथे अनुभवता येणार आहे.खवय्यां साठी साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, मासवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे , प्रसिद्ध जेन घोंगडीही उपलब्ध आहे, यासाठी शेतकरी भगिनी मोठ्या संख्येने मुंबईत जमल्या आहेत.

दुष्काळी भागातील भगिनींना प्रोत्साहीत करण्य़ासाठी याठिकाणी आवर्जून भेट द्या, असे आवाहन माणदेशी फ़ाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी मुंबईकरांना केले आहे.

साताऱ्यातील माण एक दुष्काळग्रस्त भाग, दुष्काळामुळे शेती नाही, हाताला काम नाही. परिस्थितिशी दोन हात करण्यासाठी माणदेशी फ़ाऊंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी परिसरातील १० लाख महिलांना एकत्र करत स्वयंरोजगार सुरू केला. तेथील संस्कृती,खाद्य पदार्थ आदींचे बचत गट करून भगिनीना उद्योग-व्यवसायात उभे केले.

उत्पादनाची बाजारपेठ शहरात मिळवण्यासाठी ‘माणदेशी महोत्सवा’ चा जन्म झाला. ७ हजार महिलांनी माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या माध्यमातून छोटी कर्जे घेत स्वयंरोजगारासाठीची यंत्रे विकत घेतली आहेत. महिलांना प्रशिक्षण दिले आहे. त्यातून अनेक वस्तू मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत.

५ ते ८ जानेवारी दरम्यान मुंबई प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव भरला आहे.या महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. ८ जानेवारीपर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत हा महोत्सव सर्वासाठी मोफत खुला आहे.हेही वाचा

60 टक्के ग्राहकांची ऑनलाईन खरेदीला उदासिनता, जाणून घ्या कारण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा