Advertisement

सहा महिने वृद्धाश्रमात सेवा करण्याची अनोखी शिक्षा

मुंबई हायकोर्टानं ५ तरुणांना ६ महिने वृद्धाश्रमात जाऊन सेवा कण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे.

सहा महिने वृद्धाश्रमात सेवा करण्याची अनोखी शिक्षा
SHARES

मुंबई हायकोर्टानं ५ तरुणांना ६ महिने वृद्धाश्रमात जाऊन सेवा कण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. ऑनलाईन गेमिंगमधील गुंतवणुकीच्या संदर्भात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या तरुणांवर करण्यात आला आहे. याप्रकरणाचीच सुनावणी हायकोर्टात सुरू होती.

याप्रकरणी दाखल फौजदारी खटल्यामुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे, हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारा या तरूणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या घटनेनंतर आपली नोकरी गेली आणि गुन्हा नोंद असल्यानं नवी नोकरीही मिळत नाही. त्यामुळे हा दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी पाचही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

तक्रारदाराच्या सहमतीनं हे प्रकरण परस्पर मिटवण्यात आलं असून दाखल झालेला गुन्हा रद्द झाल्यास तक्रारदारालाही हरकत नाही असंही पोलिसांच्या वतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं.

मात्र दाखल गुन्हा रद्द करताना केलेल्या गुन्हाची अद्दल घडावी, म्हणून हायकोर्टानं पाचही आरोपींना पुढचे सहा महिने पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पुण्यातील 'निवार' वृद्धाश्रमात काम करण्याची शिक्षा सुनावली.

तसंच सहा महिन्यांनी तिथं काम केल्याचं प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. तसंच या पाच जणांनी ऑनलाइन गेमिंगमधील मोठ्या नफ्याच्या हव्यासापोटी पैसे पुरवणाऱ्या तक्रारदार मित्रालाही त्यांच्यासोबत तिथं सेवा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्या पाच तरूणांनी आपल्या ओळखीच्याच एका व्यक्तीला ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठा नफा कमावून देण्याच्या नावाखाली पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केलं होतं. त्या तरूणानं त्यांच्यावर विश्वास ठेवत पैसेही गुंतवले.

मात्र, त्यानं नंतर आपले पैसे परत मागितले असता आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि वर त्याच्याकडे आणखीन पैसे मागितले.



हेही वाचा

निवृत्त कर्नलसाठी ‘तो’ स्विगी डिलिव्हरी बॉय ठरला देवदुत!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा