Advertisement

अवयवदानासाठी 'ते' काढणार मुंबई ते गोवा पदयात्रा !


अवयवदानासाठी 'ते' काढणार मुंबई ते गोवा पदयात्रा !
SHARES

अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘देहदान अवयव दान महासंघ (द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन)ने 'अवयवदान वारी-२०१८' काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २३ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीत मुंबई ते गोवा अशी पदयात्रा काढली जाणार आहे. 


अवयवदानाबाबत जागरुकता आवश्यक

आजही अवयवदान करण्यासाठी लोकं पुढे येत नाही. किंवा जवळची व्यक्ती सोडून गेली तर ती अवयवरुपी आपल्यात जीवंत राहील हे स्वीकारायला तयार नसतात. त्यामुळे आता राज्य सरकारसोबत अनेक संस्थाही अवयवदानाबाबत जागरुकता निर्माण करत आहेत. 

याच पाश्र्वभूमीवर, अवयवदानासाठी मुंबईतील १൦ व्यक्तींनी पुढाकार घेत मुंबई ते गोवा अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या वारीत मुंबईत अवयवदानासाठी काम करणारे श्रीकांत आपटे, पुरुषोत्तम पवार, शैलेश देशपांडे, चंद्रशेखर देशपांडे, प्रियदर्शन बापट, अविनाश कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी आणि नागपूर येथील शरद दाऊतखानी अशा दहा जणांचा सहभाग असणार आहे. 


अवयवदानाच्या पदयात्रेची सांगता कुठे?

२३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता पालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या आवारातून अवयव जनजागृतीच्या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. कोकणातील गावागावांतून ८२६ कि. मी. अंतर पायी पार करून १५ एप्रिलला गोव्यातील पणजीत या अवयवदानाच्या पदयात्रेची सांगता होणार आहे. शिवाय, या कालावधीत पायी प्रवास करताना ५२ ठिकाणी थांबून अवयवदानाच्या बाबतीत माहिती देण्यासाठी सभा देखील घेतल्या जातील. 

द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. गावखेड्यातील लोकांना अवयवदानाचं महत्त्व पटवून सांगणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. 

गेल्या वर्षी आम्ही नाशिक-नागपूर-आनंदवन अशी पदयात्रा काढली होती. ही पदयात्रा 'अवयवदान वारी' या नावाने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात प्रसिद्ध आहे. याच उपक्रमाचा पुढील भाग म्हणून यावर्षी मुंबई ते गोवा, अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक मुक्कामात अवयवदान आणि देहदान जागृतीपर शाळा कॉलेज प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा ठिकाणांवर आणि जाहीर कार्यक्रमातून गावांच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणांवर प्रबोधनपर  सादरीकरणे होतील. 

- सुनील देशपांडे, सदस्य, द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा