Advertisement

'या' नियमांतर्गत सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी होणार खुलं

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं खुली भाविकांसाठी खुली होणार आहेत.

'या' नियमांतर्गत सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी होणार खुलं
SHARES

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं खुली भाविकांसाठी खुली होणार आहेत. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेली राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं गुरूवारपासून खुली करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिरही उद्यापासून भाविकांसाठी पुन्हा खुलं केलं जाईल अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टनं दिली. मात्र, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

'भाविकांना गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी भाविकांना श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अ‍ॅपवर QR कोड प्री-बुकिंग करणं अनिवार्य असणार आहे. दर तासाला फक्त २५० भाविकांनाच दर्शनासाठी QR कोड दिला जाईल', अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

राज्यातील भाविकांसाठी धार्मिकस्थळं जरी खुली करण्यात येत असली तरीही कोरोनाचा धोका टळलेला नसल्यानं सर्व नियमांचं काटेकोरपणं पालन होणं अत्यंत आवश्यक असणार आहे. मंदिरात भाविकांना मास्क घालणं, शारीरिक अंतर राखणं अशा सर्व कोरोनाप्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे, थर्मल स्कॅनिंगनंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अ‍ॅपवर बुधवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दर्शनासाठी QR कोड नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर, दर गुरुवारी अ‍ॅपवर भाविकांना पुढील आठवड्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा