Advertisement

स्वातंत्र दिन २०१९ : चिमुकल्यांनी साकारली खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाईंची कलाकृती

स्वातंत्र्यदिनी या महान शास्त्रज्ञाच्या स्म्रृतींना उजाळा देण्यासाठी आणि कलेच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्यासाठी वर्ल्ड रेकाॅर्ड आर्टिस्ट चेतन राऊत आणि संदीप बाेबडे यांच्या संकल्पनेतून, कागदाच्या विमानांपासून साकार झालीय एक अप्रतिम कलाकृती.

स्वातंत्र दिन २०१९ : चिमुकल्यांनी साकारली खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाईंची कलाकृती
SHARES

स्वप्नं... आपण अगदी लहानपणापासून पाहत असताे. आपल्या सर्वांची स्वप्नं माेठीच असतात. काहींची पूर्ण हाेतात तर काहींची अपूर्ण राहतात. पण म्हणून स्वप्नं बघणं कुणी सोडून देत  नाही. कागदापासून बनवलेलं विमान जेव्हा उडायचं तेव्हा हाेणारा आनंद हा अपरंपार असायचा. कारण त्यात आपली इवलीशी स्वप्नंं पेरलेली असायची आणि जणू काही त्या स्वप्ननांनीच आभाळभरारी घेतल्याचा आनंद लहानपणी मिळायचा. 

स्वातंत्र्यदिनी कलाकृती

असंच काहीसं आसमानाला गवसणी घालण्याचं स्वप्नं पाहून ते पूर्ण करणारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आहेत विक्रम अंबालाल साराभाई. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. १५ ऑगस्टचं औचित्य साधत विक्रम अंबालाल साराभाई यांची भव्यदिव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

विक्रम साराभाईंना मानवंदना

उज्ज्वल फ्युचर फाउंडेशनच्या मुलांनी तसंच चेतन राऊत आणि संदीप बाेबडे यांचे सहकारी, अशरफ खान, स्वप्निल खाडे, ईशा मुणगेकर, मेघना राणे, स्मिता ढाेबळे, किरण सावंत, मिलिंद भुरवणे, ऋषीकेश माने, धर्मेश मोरे यांनी विषेश कामगिरी बजावून साकार केलीय ही भव्यदिव्य अशी कलाकृती! १०/१२ फूट आकाराच्या कलाकृतीत ५ हजार ५०० काळ्या, पांढऱ्या, लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या, केशरी या रंगांच्या कागदांचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकृती केवळ २६ तासांत साकारण्यात आली आहे. तुम्हाला ही कलाकृती पाहायची असेल, तर धारावीतील हराळे सेवा संघाच्या हॉलला भेट द्या.

साराभाई यांची कामगिरी

१९७५ मध्ये जो पहिला अंतराळ उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच करण्यात आली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व यांचा मोलाचा वाटा आहे.

मिशन मंगल

नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान - २ या माेहिमेमध्ये जे प्रमुख तीन भाग आहेत, आँर्बिटर, लँडर, आणि सहाचाकी राेव्हर. ज्यातील लँडरचंं नाव "विक्रम" असं ठेवण्यात आलं आहे. जे अर्थात विक्रम साराभाई ह्यांच्या सन्मानार्थचं देण्यात आलं आहे. असे हे महान शास्त्रज्ञ ज्यांनी भारताला अंतराळात एक नवा आयाम प्रस्थापित करून दिला. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्षही आहे. स्वातंत्र्यदिनी या महान शास्त्रज्ञाच्या स्म्रृतींना उजाळा देण्यासाठी आणि कलेच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्यासाठी वर्ल्ड रेकाॅर्ड आर्टिस्ट चेतन राऊत आणि संदीप बाेबडे यांच्या संकल्पनेतून, कागदाच्या विमानांपासून साकार झालीय, महान शास्त्रज्ञ 'विक्रम साराभाई' यांची प्रतिमा.

कुठे : हराळे सेवा संघ, सकीनाबाई चाळ, जुन्या पोस्ट ऑफिसच्या मागे, धारावी, मुंबई -१७
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा